ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - सिक्सर किंग युवराज सिंग आणि बॉलीवूड अभिनेत्री हेजल किच यांच्या विवाहाचा मुहुर्त आता जवळ येत आहे. युवी आणि हेजल यांचा विवाह हिंदू आणि शीख पद्धतीने होणार असून, दोघांच्याही विवाहाची पत्रिकाही समोर आली आहे. या पत्रिकेचे वैशिष्ट्य म्हणजे एका क्रिकेटपटूला साजेल अशा पद्धतीने या पत्रिकेलाही क्रिकेट टच देण्यात आला आहे.
युवी आणि हेझल 30 नोव्हेंबरला चंदिगड येथे पंजाबी पद्धतीने विवाहबद्ध होतील. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी गोव्यात होणाऱ्या विवाह सोहळ्यात दोघेही हिंदू पद्धतीने सप्तपदी घेतील. युवीच्या रॉयल विवाह सोहळ्यासाठी लग्नपत्रिका क्रिकेटला समोर ठेवून डिझाइन करण्यात आली आहे. तसेच पत्रिकेवर युवराज हेजल प्रीमिअर लीग असे नाव देण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे युवी आणि हेझलने पत्रिका डिझाइन करणाऱ्या सँडी आणि कपिल खुराणा यांना अशा प्रकारे पत्रिका डिझाइन करण्यास सूचवले होते.