- नबीन सिन्हा, नवी दिल्ली
बांगलादेशातील ढाका शहरात गेल्या आठवड्यात २० विदेशी नागरिकांच्या झालेल्या निर्घृण हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक व इस्लामचे अभ्यासक तसेच वक्ते डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणांची तपासणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करीत आहे. आर्टिसन बेकरीतील या हत्याकांडात सक्रिय सहभाग असलेल्या पाच बांगलादेशी अतिरेक्यांपैकी एकाने मुंबईस्थित नाईक यांच्या प्रवचनांचे अनुसरण केले होते, असे समोर आल्यानंतर एनआयएने त्यांची भाषणे, लिखाण तसेच त्यांच्या संस्थेचे कार्य यांची तपासणी सुरू केली आहे.या हत्याकांडानंतर नाईक प्रसारमाध्यमांत चर्चेचा विषय ठरले आहेत. होले आर्टिसन बेकरीतील या हत्याकांडात सक्रिय सहभाग असलेल्या पाच बांगलादेशी अतिरेक्यांपैकी एकाने मुंबईस्थित नाईक यांच्या प्रवचनांचे अनुसरण केले होते, असे समोर आले आहे. मुस्लिमांच्या दहशतवादाचा डॉ. झकीर नाईक पुरस्कार करीत असल्याची टीका वारंवार होत आली आहे. त्यामुळे काही देशांनी त्यांना देशात येण्यास बंदीही घातली आहे.नाईक यांच्या प्रवचन व भाषणांचा एनआयए अभ्यास करीत करीत असून, त्यांच्याशी संबंधित वस्तुस्थितीबाबत अधिक सावधगिरी बाळगा व नेमकी माहिती मिळवा, असे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. नाईक भाषणांतून कोणत्याही दहशतवादी संघटनेची वकिली करतात का किंवा दहशतवादाला न्याय्य वा योग्य ठरवतात का याचा शोध एनआयएच्या गुप्तचरांना घेण्यास सांगण्यात आले आहे. नाईक हे पीस टीव्हीवर प्रवचने देतात. त्यांच्यावर इंग्लंड, मलेशिया आणि कॅनडात प्रवेश करण्यास बंदी आहे.