क्वालालंपूर: भारतात धार्मिक तेढ निर्माण करणारा पळपुटा झाकीर नाईक त्याच्या मुलाचे लग्न लावून देण्याची तयारी करत आहे. यासाठी तो मुलगी शोधत असून सून कशी असावी, याच्या अटीच त्याने सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. या अटी पाहून मुस्लिम तरुणी देखील संतापल्या आहेत. (Zakir Naik posts Facebook ad seeking wife for son)
फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये झाकीर नाईकने मुलासाठी योग्य धार्मिक मुस्लिम मुलगी शोधण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये त्याने मुलगी चारित्र्यवान असावी असे म्हटले आहे. झाकीर नाईक याने म्हटलेय की, ''मी माझा मुलगा फरीकचे लग्न लावण्यासाठी मुलीचा शोध घेत आहे. एक धार्मिक मुस्लिम मुलगी जिचे चारित्र चांगले असेल, कारण माझा मुलगा आणि त्याची पत्नी एकमेकांची ताकद बनू शकतील. जर तुम्ही अशा मुलीचे वडील किंवा नातेवाईक असाल तर पूर्ण माहिती घेऊन या पोस्टला उत्तर द्यावे. नाईकने यामध्ये त्याच्या कुटुंबीयांची माहिती दिली आहे.
भारतात गुन्हे दाखल झाल्याने मलेशियातच राहिलेला झाकीर नाईक याने सुनेसाठी काही अटी ठेवल्या आहेत. यामध्ये कुराण आणि हदीसच्या शिक्षणानुसार मुलीने इस्लाम मानने आवश्यक आहे. मुलगी सर्वप्रकारच्या हराम गोष्टींपासून दूर रहावी. मुलगी धार्मिक आणि चारित्र्य चांगले असावे. सुनेने इस्लामचा प्रसार करावा. आलिशान आयुष्य जगण्याची इच्छा नसावी. इंग्रजी बोलता यावे. तसेच मलेशियात राहण्यासाठी तयार असावे. कोणत्याही इस्लामिक संघटनेशी जोडलेली असावी.
यावरून झाकीर नाईक ट्रोल होऊ लागला आहे. मिली मार्टेजाने लिहिले की, मुली मुलांशी लग्न करतील. परंतू अशा मुलाशी नाही ज्याला पत्नी शोधण्यासाठी आपल्या बापाची मदत लागेल.
उगबाद नूर सनाले ले लिहिलेय की, तुम्ही एका अशा संस्कृतीचा प्रसार करत आहात ज्यामध्ये खूपच जास्त मागण्या आहेत. तुम्हाला अशी परफेक्ट मुलगी हवी आहे जी या जगात सापडत नाही. तुम्हाला तुमचा मुलगा सुखी रहावा असे वाटत नाहीए का, की तुमचा मुलगा अटी आणि शर्थींच्या आधारावर जगावा असे वाटत आहे का. काही पालक आपल्या मानसिकतेमुळे आश्चर्यांत टाकत आहेत.