शहरं
Join us  
Trending Stories
1
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
2
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
3
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
4
सलमाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी कॉल केला ट्रेस
5
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
6
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
7
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
8
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
9
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
10
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
11
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
12
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
13
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
14
अजय देवगण अन् 'भूल भूलैय्या ३'च्या दिग्दर्शकाचा १० वर्ष रखडलेला सिनेमा, 'नाम'ला अखेर मिळाली रिलीज डेट
15
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
16
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
17
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
18
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
19
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
20
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

Lok Sabha Election 2019 : दहशतवादी बुरहान वाणीच्या गावात शून्य मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 11:04 AM

तीन वर्षापूर्वी सुरक्षा रक्षकांसोबतच्या चकमकीत मारल्या गेलेल्या हिज्बुल मुजाहिद्दीनचा पोस्टर बॉय बुरहान वाणीच्या गावात शून्य मतदान झाले आहे.

ठळक मुद्देतीन वर्षापूर्वी सुरक्षा रक्षकांसोबतच्या चकमकीत मारल्या गेलेल्या हिज्बुल मुजाहिद्दीनचा पोस्टर बॉय बुरहान वाणीच्या गावात शून्य मतदान झाले आहे. बुरहान वाणीच्या गावात एकाही मतदानाची नोंद झालेली नाही. सूसाइड बॉम्बर आदिल अहमद डार याच्या गावात केवळ 15 लोकांनीच मतदान केले आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी (6 मे) काश्मीरमधील अनंतनाग व पश्चिम बंगालमधील बराकपोर मतदारसंघातील हिंसाचार वगळता सर्व 51 ठिकाणी शांततेत मतदान पार पडले. याही टप्प्यात अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रे बंद पडल्याच्या तसेच ती नीट चालत नसल्याच्या असंख्य तक्रारी आल्या. या टप्प्यात बंगालमध्ये 74 टक्के, तर अनंतनागमध्ये 3 टक्के मतदान झाले. पुलवामा व शोपिया हा भाग अनंतनाग मतदारसंघात येतो. दहशतवाद्यांनी मतदानावर बहिष्काराचे आवाहन केले होते. त्यामुळे मतदारही घराबाहेर पडायला तयार नव्हते. या मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्रे येतात. मतदारांची संख्या सुमारे सव्वापाच लाख आहे. पण दुपारी दोन वाजेपर्यंत केवळ 1.8 टक्केच मतदान झाले होते. हा देशातील एकमेव मतदारसंघ आहे, जिथे मतदान तीन टप्प्यांत होत आहे. याआधीच्या दोन टप्प्यांतही तिथे जेमतेम 8 ते 9 टक्के मतदान झाले होते. 

तीन वर्षापूर्वी सुरक्षा रक्षकांसोबतच्या चकमकीत मारल्या गेलेल्या हिज्बुल मुजाहिद्दीनचा पोस्टर बॉय बुरहान वाणीच्या गावात शून्य मतदान झाले आहे. बुरहान वाणीच्या गावात एकाही मतदानाची नोंद झालेली नाही. फेब्रुवारीमध्ये पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी  सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यातील सूसाइड बॉम्बर आदिल अहमद डार याच्या गावात केवळ 15 लोकांनीच मतदान केले आहे. तसेच दक्षिण काश्मीरमध्ये इतर दहशतवाद्यांच्या गावातही कोणीही मतदान केले नसल्याची माहिती समोर येत आहे. 

अनंतनाग मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी लोकांमध्ये उत्साह नव्हता. मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन दहशतवाद्यांनी केले होते. समाजकंटकांनी काही ठिकाणी दगडफेक केली, तर एका मतदान केंद्रापाशी ग्रेनेड फेकण्यात आला. त्याच्या स्फोटात कोणीही जखमी झाले नाही. मात्र त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली. तेथील काही मतदान केंद्रांवर एक ते तीन मतदारांनीच आपला हक्क बजावला. पाचव्या टप्प्यात आतापर्यंत सर्वात कमी 63.5 टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक 69.50 टक्के मतदान पहिल्या टप्प्यात झाले तर दुसऱ्या टप्प्यात 69.44 टक्के मतदान झाले. तिसऱ्या टप्प्यात 68.40 आणि चौथ्या टप्प्यात 65.51 टक्के मतदान झाले.

Lok Sabha Election 2019 : अनंतनाग मतदारसंघामधील मतदान केंद्रे रिकामीपुलवामा व शोपियामध्ये रस्त्यांवर मतदार नसले तरी सुरक्षा दलाचे जवान व वाहने मोठ्या प्रमाणात होती. दहशतवाद्यांच्या भीतीने गावांमधील दुकानेही बंदच होती.काश्मीरमधील पुलवामा व शोपियां या भागांत दहशतवादी सक्रिय असल्याने हा परिणाम दिसत होता. कुपवाडा जिल्ह्यातील काकापोरा या लहान शहरातही हेच दृश्य होते. तिथे एका केंद्रात मतदारांची संख्या 1039 असून, तिथे दोनच जणांनीच दहशतवाद्यांच्या धमकीला न घाबरता मतदान केले. अनेक मतदान केंद्रांत एक, दोन वा तीनच मतदार दुपारपर्यंत आले होते. लोकांना घाबरवण्यासाठी सोमवारी सकाळीच समाजकंटकांनी काही भागांत दगडफेक सुरू केली होती. अनेक घरांच्या काचा फुटल्या त्यामुळे लोक बाहेरच पडले नाहीत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकanantnag-pcअनंतनागterroristदहशतवादीVotingमतदानJammu Kashmirजम्मू-काश्मीर