शहरं
Join us  
Trending Stories
1
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
2
ठाकरेंवर टीका करून पक्ष सोडला होता; आता ८ महिन्यात शिंदेसेनेलाही रामराम केला, कारण...
3
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
4
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
5
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
6
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
7
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "माझी पत्नी जयश्री..."
8
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
9
3 दिवसांत 12 भारतीय विमानांना बॉम्बच्या धमक्या; आता गृहमंत्रालय करणार कडक कारवाई...
10
'मशाली'सारखा 'तुतारी'ला फटका; काँग्रेसच्या सांगली पॅटर्नची विदर्भात पुनरावृत्ती? 
11
राष्ट्रवादीतून मोठी आऊटगोईंग?; प्रश्न विचारताच अजित पवार भडकले, खंबीर असल्याचं सांगत म्हणाले...
12
मुख्यमंत्री शिंदेंनी ‘रिपोर्टकार्ड’वर नव्हे तर ‘रेट कार्ड’वर बोलावे; नाना पटोलेंचे टीकास्त्र
13
महाराष्ट्रात कोण असेल महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
14
“आम्ही ठरवले आहे की पुन्हा सत्तेत आल्यास बहि‍णींना ३ हजार देणार”; शिंदे गटातील नेत्याचा शब्द
15
10 पत्नी, ६ गर्लफ्रेंड, जग्वार अन् विमानातून प्रवास; शौकीन चोराची चक्रावून टाकणारी गोष्ट!
16
दुसऱ्यांदा विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, अकासा एअरच्या प्लेनचे दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग
17
२ तास ३५ मिनिटं घाबरवलं; डिजिटल अरेस्ट करून वृद्धाला २८ लाखांचा गंडा, एक कॉल अन्...
18
जम्मू काश्मीरमध्ये बिघडला 'इंडिया' आघाडीचा खेळ; सत्तास्थापनेत काँग्रेस बाहेर
19
UPI पेमेंट सर्व्हिस लवकरच ५० नवीन ॲप्सवर मिळणार, NPCI कडून मोठी घोषणा
20
भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारा कोच आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, अखेर घरवापसी झाली

झिका व्हायरसने वाढवली देशाची चिंता; केरळमध्ये 15 रुग्ण, हायअलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 3:47 PM

Zika Virus in India : सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर गंभीरतेने लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, असे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले.

Zika Virus in India : एकीकडे देश कोरोना सारख्या महामारीशी लढत आहे. तर दुसरीकडे धोकादायक झिका व्हायरसचा (Zika Virus) प्रादुर्भावही वाढताना दिसत आहे. यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. केरळमध्ये झिका व्हायरसचे 15 रुग्ण आढळून आले आहेत. ANI च्या वृत्तानुसार, केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी (Kerala Health Minister Veena George) यासंदर्भात माहिती दिली. याआधी राज्यात 14 रुग्णांची नोंद होती. आता हा आकडा 15 वर पोहोचला आहे.

राज्य सरकार हाय अलर्टवरझिका व्हायरसची लक्षणे आणि परिणामांवर काटेकोरपणे लक्ष ठेऊन आहोत. राज्य सरकार हाय अलर्टवर आहे. केरळमध्ये झिका व्हायरसचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी अॅक्शन प्लॅनवर काम केले जात आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर गंभीरतेने लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, असे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले.

पहिला रुग्ण एक गर्भवती महिला होतीकेरळमध्ये झिका व्हायरसची लागण होणारी पहिली व्यक्ती गर्भवती महिला होती. महिला आणि तिचे बाळ बरे होत आहेत. झिका व्हायरसचे 19 सॅम्पल पुण्यातील एनआयवीच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यातील 13 सॅम्पल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर आम्ही पुन्हा 14 सॅम्पल टेस्टसाठी पाठवले आहेत. त्यामध्ये ते सर्व निगेटिव्ह आले आहेत, असे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले.

सध्या परिस्थिती नियंत्रणातआरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की,  राज्य सरकारजवळ झिका व्हायरसवर मात करण्याचा प्लॅन तयार आहे. आम्ही यासाठी पूर्ण तयारी करत आहोत. केंद्र सरकारची टीम राज्यात येऊन पाहणी करण्याची शक्यता आहे. परंतु या व्हायरसबाबत भीती निर्माण होण्यासारखे काही नाही. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

टॅग्स :KeralaकेरळZika Virusझिका वायरस