तत्पूर्वी रिलायन्स जिओनं प्राइम मेंबरशिप घेण्याची मुदत 15 एप्रिलपर्यंत वाढवून ग्राहकांना समर सरप्राईज ऑफर दिली होती. तसेच जिओची प्राईम मेंबरशिप घेणाऱ्या ग्राहकांना तीन महिने म्हणजे वेलकम ऑफरप्रमाणेच अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगचा लाभ घेता येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे ट्रायच्या आदेशानंतर जिओवर ही ऑफर मागे घेण्याची नामुष्की ओढावली होती. ज्या ग्राहकांनी जिओ समर सरप्राइज ऑफर मागे घेण्याआधी प्राइम मेंबरशिप घेतली आहे, अशा ग्राहकांना तीन महिने म्हणजे वेलकम ऑफरप्रमाणेच अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगचा लाभ घेता येणार आहे.
जिओ धमाका! आता येणार Jio चा स्वस्त 4G लॅपटॉप
सप्टेंबर 2016 मध्ये रिलायन्स जिओने मोफत 4जी अनलिमिटेड डेटा आणि मोफत व्हॉईस कॉलिंगची सेवा लाँच केली होती. वेलकम ऑफर असं या सेवेचं नाव होतं. 31 डिसेंबर 2016 ला ही ऑफर संपण्यापूर्वीच कंपनीने ही ऑफर वाढवून पुन्हा हॅप्पी न्यू इयर ही ऑफर लाँच केली. तसेच एकाहून एक सरस ऑफर आणून धमाका करणारी कंपनी रिलायन्स जिओ आणखी एक धमाका करणार आहे. जिओ आता स्वस्त लॅपटॉप आणणार असल्याचं वृत्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिओ लवकरच 4जी सिम कार्ड स्लॉट असलेला लॅपटॉप लॉन्च करणार आहे.