गोव्यातील सिली सोल्स कॅफे अँड बारवरून स्मृती इराणींच्या मुलीवर काँग्रेसने केलेले आरोप आता कायदेशीर नोटिशीपर्यंत पोहोचले आहेत. काँग्रेस नेत्यांविरोधात इराणी यांच्या वकिलांनी कायदेशीर नोटीस पाठविली आहे. काँग्रेस पक्ष, जयराम रमेश, पवन खेरा आणि नेटा डिसूझा यांना ही नोटीस पाठविण्यात आली आहे.
या नोटीसीमध्ये म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांना आमच्या अशिलाला (स्मृती इराणी) आणि त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य करायचे नाही, तर आमच्या अशिला आणि त्यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे त्यांनी उत्तर द्यायचे आहे. काँग्रेसचा आरोप आहे की त्यांची १८ वर्षांची मुलगी जोश इराणी गोव्यात 'सिली सॉल्स कॅफे अँड बार' नावाचे रेस्टॉरंट चालवते. तिला गोव्याच्या उत्पादन शुल्क विभागाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. यूट्यूबवर 'स्मृती इराणींचे मौन तोडा' आणि 'स्मृती इराणींच्या कौटुंबिक भ्रष्टाचाराची गाथा' आणि इंस्टाग्रामवर शेअर केलेला 'हम अखबार भी चलते हैं बदनाम' व्हिडिओ अशा शीर्षकांसह खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्यात आली आहे, बदनामीकारक, अपमानास्पद टिप्पणी करण्यात आल्याचे या नोटीशीमध्ये म्हटले आहे.
इराणी यांचे वकील कीरत नागरा यांनी जोइशबाबतचा खुलासा करताना ती त्या बारची मालकीन नाही किंवा ती तो बार चालवत नसल्याचे म्हटले होते. तसेच तिला अशी कोणतीही नोटीस मिळालेली नाही असेही तिने म्हटले होते. जोईश ही १८ वर्षीय विद्यार्थीनी आहे, जी शेफ बनण्यासाठी अभ्यास करत आहे. यामुळे ती पाककलेमध्ये पारंगत होण्यासाठी वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये काम करते, असे नागरा म्हणाले होते.
दुसरीकडे काँग्रेसचे वकील Aires Rodrigues यांनी अबकारी आयुक्तांनी नोटीस पाठविली आहे, त्याची सुनावणी २९ जुलैला होणार आहे. तेव्हा सर्वांनाच समजून जाईल की कोणते भूत हे रेस्टॉरंट चालवत होते, असे म्हटले आहे.