शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

'झूम' व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप सुरक्षित नाही; गृह मंत्रालयाकडून सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 7:57 PM

झूम अ‍ॅपवर व्हिडिओ कॉल करताना गृहमंत्रालयाने काही सूचना दिल्या आहेत. त्या सूचनांचे पालन करुन सतर्कता बाळगली जाऊ शकते.

नवी दिल्ली :  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  देशात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनदरम्यान लोक झूम व्हिडीओ कॉलिंग/ कॉन्फरन्सिंग अ‍ॅपचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. मात्र, झूम अ‍ॅपसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने एक सूचनापत्र काढले आहे. 

यामध्ये म्हटले आहे की, झूम अ‍ॅप सुरक्षित नाही. त्यामुळे  लोकांनी सतर्क राहून याचा वापर करावा. याआधीही केंद्र सरकारने ६ फेब्रुवारी आणि ३० मार्चला लोकांना झूम अ‍ॅप संदर्भात सतर्क राहण्यास सांगितले होते, असेही गृह मंत्रालयाने या पत्रकात म्हटले आहे.

केंद्र सरकारने म्हटले आहे की, जर लोक झूम अ‍ॅपचा  वापर करत आहेत तर काही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे. सतत पासवर्ड बदलला पाहिजे. कॉन्फ्रेंस कॉलमध्ये कोणालाही परवानगी देताना सतर्क असले पाहिजे. दरम्यान, झूम अ‍ॅपवर व्हिडिओ कॉल करताना गृहमंत्रालयाने काही सूचना दिल्या आहेत. त्या सूचनांचे पालन करुन सतर्कता बाळगली जाऊ शकते.

गृह मंत्रालयाच्या सूचना- प्रत्येक मीटिंगसाठी नवा युजर आयडी, पासवर्डचा वापर करा. - वेटिंग रुमला एनेबल करा. त्यामुळे कॉन्फरन्स करणारा जोपर्यंत परवानगी देत नाही, तोपर्यंत कोणताही युजर कॉलमध्ये सामील होऊ शकत नाही.-ज्वाइन ऑप्शनला डिसएबल करा.- स्क्रीन शेअरिंगचा ऑप्शन फक्त होस्टजवळ ठेवा.- कोणत्याही व्यक्तीसाठी रिज्वाइनचा ऑप्शन बंद करा.- फाइल ट्रान्सफरचा ऑप्शन कमीत-कमी वापरा.

दरम्यान,  जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनदरम्यान झूम व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅपचा डाऊनलोडिंगमध्ये मोठा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, काही दिवसांनतर झूम अ‍ॅप युजर्सच्या प्रायव्हसीवरून वादात अडकले आहे. गुगल आणि टेस्ला यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना झूम अ‍ॅप वापरण्यास मनाई केली आहे. यातच अशी माहिती येते की, झूम अ‍ॅपचे पाच लाख अकाऊंट झाले असून डेटा डार्क वेबवर विकला जात आहे. 

ब्लीपिंग कम्प्युटरने आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, झूमचे पाच लाख अकाऊंट हॅक करण्यात आहेत आणि डार्क वेबवर कमी किंमतीत युजर्सचा खासगी डेटा विकला जात आहे. यासंबंधी सर्वात आधी एक एप्रिलला सायबर सिक्युरिटी फर्म Cyble ने माहिती दिली होती. रिपोर्टनुसार, डार्क वेबवर झूम अ‍ॅप युजर्सचा डेटा $0.0020 म्हणजे जवळपास 0.15 प्रति अकाऊंट विकले जात आहे. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, हॅकर्सला आधीच माहिती होती, त्यामुळे नक्कीच पासवर्ड आणि आयडी हॅक केला आहे.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञानHome Ministryगृह मंत्रालयcorona virusकोरोना वायरस बातम्या