हरियाणामध्ये भाजपात भूकंप आलेला असताना काँग्रेस काहीही करून या राज्याला भाजपच्या ताब्यातून काढून घेण्याचे प्रयत्न करत आहे. यामुळे काँग्रेसला पोषक वातावरण असले तरी काठावर मतांचा दगाफटका होऊ शकतो म्हणून आपला सोबत घ्यायचे आहे. परंतू, दिल्लीनंतर पंजाब ताब्यात घेतलेल्या आपने लागूनच असलेल्या आपने काँग्रेसने दिलेला फॉर्म्युला फेटाळून लावला आहे. यामुळे हरियाणात आघाडी होण्याची शक्यता पुन्हा धुसर झाली आहे.
हरियाणात अर्ज दाखल करण्यासाठी केवळ ६ दिवस राहिले आहेत. यात सुट्ट्याही आल्या आहेत. यातच काँग्रेसने आपला सोबत घेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. भाजपात नेत्यांनी राजीनाम्यांचे सत्र सुरु केले आहे. आतापर्यंत २५ नेत्यांनी तिकीट न मिळाल्याने राजीनामे दिले आहेत.
काँग्रेसला आपची गरज वाटत असताना आपला त्यांनीच ऑफर देऊ केली आहे. कमी जागा आणि मनासारखे मतदारसंघ न मिळाल्याने आपने ही ऑफर नाकारली आहे. आपच्या सुत्रांनुसार काँग्रेसने दिलेला फॉर्म्युला मान्य नाहीय. लोकसभेसारखेच काँग्रेसने झुकायचे नाही अशी भूमिका घेतलेली आहे.
भाजपचे अनेक नेते आपच्या तिकीटावर लढण्याची शक्यता आहे. यामुळे आपही झुकायला तयार नाहीय. जर काँग्रेस याच फॉर्म्युलावर अडली तर कोणतीही आघाडी होणार नाही, अशी भूमिका आपने घेतली आहे. आपच्या उमेदवारांची पहिली यादी रविवारी येण्याची शक्यता आहे.
काँग्रेसने लोकसभेला आपला एकच जागा सोडली होती. आठ जागा स्वत: लढविल्या होत्या. हरियाणात विधानसभेला ९० जागा आहेत. एका लोकसभा मतदारसंघात सरासरी ९ विधानसभा मतदारसंघ येतात. यानुसार काँग्रेस आपला 9:1 च्या फ़ॉर्म्युल्यावर जागा वाटप करण्यास सांगत आहे. म्हणजे आपला केवळ ९ जागा मिळणार आहेत. उरलेल्या ८० जागा काँग्रेस लढविणार आहे. तर आपला जेवढ्या जागा लढवायच्या आहेत तेवढ्या द्यायला काँग्रेस तयार नाही.