शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

Coronavirus : लहान मुलांसाठी झायडस कॅडिलाने विकसित केली लस, जुलै अखेरपर्यंत मंजुरी मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 7:55 PM

Coronavirus : कंपनी आपल्या लसीसाठी जून किंवा जुलैच्या अखेरपर्यंत आपत्कालीन वापरास मान्यता मिळविण्याच्या तयारीत आहे.

ठळक मुद्देकोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी कॉकटेल-आधारित मोनोक्लोनल अँटीबॉडी विकसित करणारी कॅडिला हेल्थकेअर भारतातील एकमेव कंपनी आहे.

नवी दिल्ली : गुजरातमधील अहमदाबाद येथील झायडस कॅडिला (Zydus Cadila) ग्रुप 5  ते 12 वर्ष वयोगटातील मुलांसाठी कोरोना व्हायरसची (Coronavirus) झायकोव्ह-डी (ZyKov-D) ही लसीच्या चाचणीसाठी योजना आखत आहे. झायकोव्ह-डी ही प्लाझमिड डीएनए लस आहे, जी न्यूक्लिएक अॅसिड लसअंतर्गत येते. अलीकडेच, झायडस कॅडिलाने प्रौढांसाठी 800 क्लिनिकल चाचण्या घेतल्या आहेत, तर 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठीही लसीची चाचणी घेण्यात आली आहे. (coronavirus: Zydus Cadila Working to Get Nod for Its 'Plasmid DNA' Covid Vaccines for 5-12 Age Group)

कंपनी आपल्या लसीसाठी जून किंवा जुलैच्या अखेरपर्यंत आपत्कालीन वापरास मान्यता मिळविण्याच्या तयारीत आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'शी बोलताना कॅडिला हेल्थकेअर लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक शरविल पटेल म्हणाले की, "आमच्याकडे 5 ते 12 वयोगटातील मुलांवरील लसीच्या चाचणीशी संबंधित चांगला डेटा असणार आहे. जर सर्व काही ठीक राहिले तर 12 ते 18 वर्षांच्या मुलांसाठी लसीला मान्यता मिळेल".

(मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण; अमित शाह म्हणाले, 'विकासाचा अविरत प्रवास सुरूच राहील' )

'मुलांसाठी अधिक फायदेशीर ठरेल लस'शरविल पटेल म्हणाले, "लसीचा विकास हा नेहमीच टप्प्यात असतो, पहिल्यांदा ज्येष्ठांसाठी, नंतर मुलांसाठी आणि त्यानंतर 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी. आमची लस मुलांसाठी अधिक फायदेशीर ठरेल. कोणतेही दुष्परिणाम दिसून येणार नाहीत. जसे की इतर लसींमध्ये सामान्यतः पाहिले जाते. या लसीचा आणखी एक फायदा म्हणजे यामध्ये इंजेक्शनची आवश्यकता लागणार नाही."

अलीकडेच, झायडस कॅडिलाने कोरोना व्हायरच्या उपचारांसाठी मोनोक्लोनल अँटीबॉडीज कॉकटेलच्या मानवी क्लिनिकल चाचणीसाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून परवानगी मागितली आहे. "झायडस कोरोना व्हायरसच्या  ZRC-3308 लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीसाठी डीसीजीआयच्या मंजुरीची प्रतीक्षा करीत आहे", असे कॅडिला हेल्थकेअरने आपल्या नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे. ही लस कोरोना व्हायरसच्या दोन मोनोक्लोनल अँटीबॉडीजची कॉकटेल आहे. झायडस कॅडिलाने म्हटले आहे की, कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी कॉकटेल-आधारित मोनोक्लोनल अँटीबॉडी विकसित करणारी कॅडिला हेल्थकेअर भारतातील एकमेव कंपनी आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसGujaratगुजरातHealthआरोग्य