चित्रकला स्पर्धेत १,८३,000 विद्यार्थी; ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’मध्ये विक्रमी नोंद

By योगेश पिंगळे | Published: September 15, 2023 07:22 PM2023-09-15T19:22:43+5:302023-09-15T19:23:43+5:30

नवी मुंबई महापालिकेचा ‘नवी मुंबई इको नाईट्स’ हा संघ आपले मागील वर्षीचे सर्वाधिक युवक सहभागाचे प्रथम क्रमांकाचे राष्ट्रीय मानांकन कायम राखण्यासाठी सज्ज‍ झाला

1, 83,000 students in painting competition; A record entry in 'Best of India Records' | चित्रकला स्पर्धेत १,८३,000 विद्यार्थी; ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’मध्ये विक्रमी नोंद

चित्रकला स्पर्धेत १,८३,000 विद्यार्थी; ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’मध्ये विक्रमी नोंद

googlenewsNext

 नवी मुंबई : इंडियन स्वच्छता लीग २.०’ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या शालेय स्तरावरील स्वच्छ चित्रकला स्पर्धेमध्ये आज नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिका व खाजगी अशा ४३१ शाळांमधील १ लाख ८३ हजार १४४ विदयार्थ्यांनी नोंदणी करुन सहभागी होत विक्रम नोंदविलेला आहे. या विक्रमाची नोंद ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ मध्ये घेण्यात आली असून १ लाखाहून अधिक विदयार्थी सहभागाचे विक्रमी प्रमाणपत्र बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्सचे भारतातील परीक्षक आंतरराष्ट्रीय क्रीडापटू बी.बी.नायक यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना प्रदान केले. 

नवी मुंबई महापालिकेचा ‘नवी मुंबई इको नाईट्स’ हा संघ आपले मागील वर्षीचे सर्वाधिक युवक सहभागाचे प्रथम क्रमांकाचे राष्ट्रीय मानांकन कायम राखण्यासाठी सज्ज‍ झाला असून त्या अनुषंगाने १२ सप्टेंबरपासून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. इयत्ता पहिली ते चौथी, पाचवी ते आठवी तसेच नववी ते दहावी अशा तीन गटांमध्ये ही स्वच्छ चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये विदयार्थ्यांनी मोठया संख्येने उत्साहाने सहभागी होत आपल्या मनातील स्वच्छता संकल्पनांना चित्ररुप दिले. यामधील सर्वोत्कृष्ट चित्रांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. स्वच्छ शहर अशी ओळख असणा-या नवी मुंबईतील विदयार्थ्यांनी नेहमीच स्वच्छता विषयक जागरुकता दाखविलेली आहे तसेच स्वच्छता विषयक उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला आहे. त्यामुळे आपल्या मनातील स्वच्छता संकल्पनांना आवडत्या चित्रकलेच्या माध्यमातून मूर्तरुप मिळण्याची संधी उपलब्ध झाल्यानंतर नवी मुंबईतील प्रत्येक शाळेतील लाखो विदयार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत हिरीरिने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या सहभागाची दखल बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स या राष्ट्रीय विक्रम नोंदविणा-या संस्थेने घेतली आहे. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व विजयकुमार म्हसाळ, प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, शहर अभियंता संजय देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, शिक्षण विभागाचे उपआयुक्त दत्तात्रय घनवट आणि इतर विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिकेला मिळालेल्या या आणखी एका विक्रमी सन्मानामध्ये नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील विदयार्थ्यांचे तसेच त्यांना प्रोत्साहन देणा-या शिक्षक व पालकांचे महत्वाचे योगदान असून हा विक्रमी बहुमान नवी मुंबईकर नागरिकांना समर्पित आहे. 
राजेश नार्वेकर, आयुक्त, न.मुं.म.पा

Web Title: 1, 83,000 students in painting competition; A record entry in 'Best of India Records'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.