विकासासाठी १०० कोटींचा प्रस्ताव तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 01:58 AM2019-12-22T01:58:21+5:302019-12-22T01:58:34+5:30

तत्त्वत: मान्यता । कर्जतच्या नगराध्यक्षांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट

1 crore proposal for development | विकासासाठी १०० कोटींचा प्रस्ताव तयार

विकासासाठी १०० कोटींचा प्रस्ताव तयार

Next

कर्जत : कर्जत नगरपरिषद हद्दीत सुमारे १०० कोटी रुपयांच्या महत्त्वपूर्ण विकासकामांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्याचे नगरविकास व जलसंधारण मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सर्व प्रस्ताव सादर केले. यावेळी त्यांच्यासमवेत माजी शिवसेना संपर्क प्रमुख संजय मोरे, युवा सेना रायगड जिल्हाधिकारी मयूर जोशी, माजी नगरसेवक संतोष पाटील, सामाजिक कार्यकर्ते केतन जोशी उपस्थित होते.

वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून कर्जत शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीलगतचा परिसर विकसित करण्यासाठी एकूण चार चौपाट्यांचे बांधकाम प्रस्तावित केले आहे. नदीला १२ ठिकाणी जोडणाºया सांडपाणी नाल्यावर ई-एसटीपीचे बांधकाम प्रस्तावित असून त्याद्वारे नैसर्गिकरीत्या सांडपाणी शुद्ध करून झाडांसाठी पूर्ण प्रक्रिया करण्याचे नियोजन केले आहे. नदीत घाटाचे बांधकामही प्रस्तावित करण्यात आलेले आहे व शहरातून जाणाºया नदीलगत उर्वरित ठिकाणी संरक्षण भिंत व गाबियन वॉलचे बांधकाम प्रस्तावित केलेले आहे. अशा सर्व कामांसाठी ४४ कोटी १२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

उल्हास नदीवरील सध्या अस्तित्वात असलेला पूलवजा बंधाºयाच्या लोखंडी प्लेट नादुरुस्त झाल्या असून, त्यामधून पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे प्लेट्सऐवजी यांत्रिकी दरवाजे बसवण्याच्या सुमारे ३ कोटी रुपयांच्या कामाला तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. हे काम जलसंधारणमधून करण्यात येणार आहे. या यांत्रिकी दरवाजामुळे नदीचे पाणी अडविणे फार सोपे होणार आहे. पर्यटन निधीअंतर्गत उल्हास नदीवर नाना मास्तरनगर येथे रबर डॅम प्रस्तावित करण्यात आला असून त्यामुळे नाना मास्तर नगर ते अमराईपर्यंत नदीत पाण्याचा साठा उपलब्ध राहील. यामुळे नदीपात्रात बारामाही पाणी राहून पर्यटक, नागरिकांना आकर्षण केंद्र होण्यास मदत होणार आहे. कर्जतमध्ये २४७ पाणीपुरवठा योजना राबविण्यासही तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे शहरात चोवीस तास पाणीपुरवठा नळाद्वारे होईल. यामध्ये पाण्याचे मीटर आॅटोमॅटिक पंप चालू-बंद होणे व एचडीएफ पाईपद्वारे पाणीपुरवठा या गोष्टी अंतर्भूत आहेत. यामुळे पाण्याची बचत होऊन पाणीपुरवठा योजनेचा खर्च कमी होऊन उत्पन्न वाढणार आहे. या कामासाठी महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान राज्य स्तरातून सुमारे २२ कोटींचे अंदाजपत्रक बनविण्यात आले आहे.

भुयारी मार्गास मान्यता
गुंडगे भिसेगांव येथील नागरिकांना कर्जत बाजारपेठेमध्ये येण्यासाठी पाच किलोमीटरचा वळसा घालून महामार्गावर यावे लागते. त्याऐवजी रेल्वे जुने गेट येथे (सब -वे) भुयारी मार्ग करण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आलेली आहे. या कामाचे वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सुमारे १५ कोटींचे अंदाजपत्रक बनविले आहे.

Web Title: 1 crore proposal for development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.