शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

घणसोलीत आढळला दहा फूट लांबीचा अजगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 11:51 PM

घणसोली गावातील शेतकरी शिक्षण संस्थेच्या आवारामध्ये दहा फूट लांबीचा अजगर शुक्रवारी सायंकाळी आढळला.

नवी मुंबई : घणसोली गावातील शेतकरी शिक्षण संस्थेच्या आवारामध्ये दहा फूट लांबीचा अजगर शुक्रवारी सायंकाळी आढळला. अजगर पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सर्पमित्र सुरेश खरात याने पाच मिनिटांत अजगर पकडून निर्जनस्थळी सोडून दिला.शिक्षण संस्थेच्या आवारामध्ये दहा फूट लांब व १५ किलो वजनाचा अजगर एक महिलेला दिसला. या विषयी महिलेने इतर नागरिकांना माहिती दिली. काही वेळात परिसरातील नागरिक अजगर पाहण्यासाठी घटनास्थळी जमा झाले होते. येथील अर्जुनवाडी येथे राहणारे सर्पमित्र सुरेश खरात यांना या विषयी माहिती देण्यात आली. खरात यांनी घटनास्थळी येऊन पाच मिनिटांमध्ये शिताफीने अजगर पकडून तो पुन्हा निर्जनस्थळी नेऊन सोडला. खरात हे सर्पमित्र म्हणून परिसरामध्ये प्रसिद्ध आहेत. नवी मुंबईमध्ये कुठेही साप, अजगर आढळल्यास नागरिकांसह अग्निशमन दलाचे कर्मचारीही त्याला बोलावत असतात. आतापर्यंत त्याने जवळपास तीन हजार साप पकडून त्यांना पुन्हा जंगलात सोडून दिले आहे. अजगर पकडल्यानंतर नागरिकांनीही सुटकेचा श्वास सोडला व सर्पमित्र खरात यांचे आभार मानले.