शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
3
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
4
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
5
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
6
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
7
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
8
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
9
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
10
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
11
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
12
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
13
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
14
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
15
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
16
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
17
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
18
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
19
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
20
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...

अवघ्या १० मिनिटांत १०० कोटी मंजूर

By admin | Published: January 21, 2016 2:38 AM

पालिकेची आर्थिक स्थिती सुधारल्याने आणि तिजोरीत खणखणाट सुरू झाल्याने नगरसेवकांसह कंत्राटदारांनाही सुगीचे दिवस आले असून निवडणुकांच्या तोंडावर बुधवारी

ठाणे : पालिकेची आर्थिक स्थिती सुधारल्याने आणि तिजोरीत खणखणाट सुरू झाल्याने नगरसेवकांसह कंत्राटदारांनाही सुगीचे दिवस आले असून निवडणुकांच्या तोंडावर बुधवारी अवघ्या १० मिनिटांत १०० कोटींहून अधिक खर्चाच्या ९८ प्रस्तावांना कोणतीही चर्चा न करता झटपट मंजुरी देण्यात आली.आजवर राजकीय कुरघोडी, परस्परांना शह-काटशह, गटा-तटांचे राजकारण, पक्षीय अभिनिवेश बाळगत वेगवेगळे प्रकल्प-कामे अडवून ठेवणाऱ्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी वेगळ्याच एकीचे दर्शन घडवत क्षणार्धात कामे मंजूर करून घेतली. त्यामुळे लवकरच ठाण्यात सर्वत्र विकासाचे वारे वाहू लागेल. गेली तीन वर्षे प्रभागातील कामे होत नसल्याने आणि मतदारांकडे कोणत्या तोंडाने मते मागायला जायचे, अशा मन:स्थितीत सर्वपक्षीय नगरसेवक सापडले होते. महासभेनिमित्ताने प्रशासनावर आगपाखड करीत सत्ताधारी आणि विरोधक आपसातही भांडताना दिसले. बुधवारच्या महासभेत प्रभाग सुधारणा निधी, दलित वस्ती सुधारणा निधी, गटार, पायवाटा, शौचालय दुरुस्ती आदींसह रस्त्यांचे विविध प्रस्ताव पटलावर आले. या वेळी एकाही प्रस्तावावर वाद न घालता अथवा आपसात न भांडता आयुक्तांच्या कौतुकाच्या मुद्याच्या आड किंबहुना जिभेवर साखर ठेवून आयुक्तांचे तोंडभरून कौतुक करीत केवळ आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून १०१ विषयांपैकी तब्बल ९८ विषयांना अवघ्या १० मिनिटांत सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंजुरी दिली. त्यामुळे आता नगरसेवकांसह ठेकेदारांचीही दिवाळीआधीच दिवाळी होणार आहे.मागील तीन वर्षे या ना त्या कारणांमुळे किंबहुना राजकीय राड्यामुळे ठाणे महापालिकेतील नगरसेवक चर्चेत राहिले आहेत. पालिकेची आर्थिक स्थिती ठीक नसल्याने महासभेत प्रशासनावर वारंवार आगपाखड करून कामांसाठी विनवणी केली जात होती. काही वेळा तर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांत हाणामारीचे प्रकारही ठाणेकरांनी पाहिले आहेत. प्रस्ताव मंजूर होवो अथवा न होवो, परंतु आपली ताकद दाखविण्यासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधक एकमेकांवर कुरघोडी करताना दिसले. प्रशासनाने आणलेल्या प्रस्तावांवर आक्षेप घेत विरोधकांनी अनेक वेळा हे प्रस्ताव अडकवून ठेवले. छोटी-छोटी भरपूर कामे आता एक वर्षावर आलेल्या ठाणे पालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने प्रत्येक नगरसेवकाला आपल्या प्रभागातील कामे कशी पूर्ण होणार, असा प्रश्न पडला होता. सप्टेंबरमध्ये प्रथमच अंदाजपत्रक मंजूर झाल्यानंतर नव्या वर्षातील पहिल्याच महासभेत शिवाजी रुग्णालयासाठी विविध सामग्री विकत घेणे, सी.आर. वाडिया रुग्णालयात स्त्रियांच्या स्तनांच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी आवश्यक यंत्रणा खरेदी करणे, शरद पवार स्टेडियमच्या दुसऱ्या टप्प्यातील काम करणे, पालिकेच्या पाच प्रसूतिगृहांत शस्त्रक्रियांच्या सुविधा, एनएसआयसीयू सेवा आदी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. दुसरीकडे गटार, पायवाटा, शौचालयांची दुरुस्ती, सिमेंट रस्ते, यूटीडब्ल्यूटी पद्धतीने नूतनीकरण, नाल्याची भिंत बांधणे, गटार बांधणे, मार्केट, स्मशानभूमीची दुरुस्ती, उद्याने आदींसह दलित वस्ती सुधारणा निधी यासह तब्बल १०१ प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आले होते. स्मशानभूमीचा, स्मार्ट पार्कचा, आरोग्य सेवा, कळवा रुग्णालयासाठी साहित्य खरेदी, भरती प्रक्रियेचा असे महत्त्वाचे आणि किचकट प्रस्तावही पटलावर होते. परंतु, स्मशानभूमीचा प्रस्ताव दप्तरी दाखल करून, भरती प्रक्रियेचा प्रस्ताव फेरसादर आणि जलवाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव वगळता १०१ विषयांपैकी तब्बल ९८ विषयांना अवघ्या १० मिनिटांत मंजुरी देण्यात आली.