कासाडी नदी शुद्धिकरणासाठी १०० कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 04:32 AM2019-03-05T04:32:51+5:302019-03-05T04:32:54+5:30
तळोजा एमआयडीसीमधील कासाडी नदीच्या शुद्धीकरण व सुशोभीकरणासाठी राज्य शासन पावले उचलणार आहे.
पनवेल: तळोजा एमआयडीसीमधील कासाडी नदीच्या शुद्धीकरण व सुशोभीकरणासाठी राज्य शासन पावले उचलणार आहे. याकरिता तब्बल १०० कोटींचा निधी देण्याची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आमदार बाळाराम पाटील यांना दिलीे. पाटील यांनी विधानपरिषदेत कासाडी नदीच्या प्रदूषणावर प्रश्न उपस्थित केला.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी यांच्यामार्फत या नदीच्या देखरेखीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. प्रदूषणासंदर्भात स्थानिक नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादात धाव घेतली आहे. एमआयडीसीमधील रासायनिक दूषित पाण्यावर प्रक्रि या करणाऱ्या सीईटीपी केंद्राला दहा कोटींचा दंड ठोठावला आहे. आमदार पाटील यांच्या सोबत झालेल्या बैठकीत पर्यावरण मंत्र्यांनी रामके कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. प्रदूषणासंदर्भात कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे.