पनवेलमधून १०० किलो गांजा जप्त,  तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:58 AM2018-03-21T00:58:18+5:302018-03-21T00:58:18+5:30

पनवेल-मुंब्रा मार्गावरून गुन्हे शाखा पोलिसांनी १०० किलो गांजा जप्त केला आहे. स्कोडा कारच्या डिकीमधून हा गांजा घेवून जाणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. तिघेही मुंब्य्राचे राहणारे असून आंध्र प्रदेशमधून ते विक्रीसाठी गांजा घेवून आले होते.

100 kg of ganja seized from Panvel, arrested three | पनवेलमधून १०० किलो गांजा जप्त,  तिघांना अटक

पनवेलमधून १०० किलो गांजा जप्त,  तिघांना अटक

Next

नवी मुंबई : पनवेल-मुंब्रा मार्गावरून गुन्हे शाखा पोलिसांनी १०० किलो गांजा जप्त केला आहे. स्कोडा कारच्या डिकीमधून हा गांजा घेवून जाणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. तिघेही मुंब्य्राचे राहणारे असून आंध्र प्रदेशमधून ते विक्रीसाठी गांजा घेवून आले होते.
पनवेल-मुंब्रा मार्गावर कारमधून मोठ्या प्रमाणात गांजा नेला जाणार असल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस नाईक किरण राऊत यांना मिळाली होती. यानुसार वरिष्ठ निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रदीप सरफरे, उपनिरीक्षक संजय पवार, हवालदार अनिल यादव, सतीश सरफरे, सागर कांबळे, किरण राऊत यांच्या पथकाने धरणा गावाजवळील टोलनाक्यावर सापळा रचला होता. यावेळी स्कोडा कार (एमएच ०२ जेपी ९४३०) अडवून पोलिसांनी झडती घेतली असता कारच्या डिकीमध्ये गोणीत भरलेला गांजा आढळून आला. याप्रकरणी कारमधील अमीर अहमद (३२), सिराज अहमद चौधरी (२३) व मोहमद उस्मान सिध्दीकी (३८) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच १०० किलो गांजासह स्कोडा कार देखील जप्त करण्यात आली आहे.
शहरात गांजा विक्रेते मोकाट असल्याने त्याच्या आहारी जाणाºयांचीही संख्या वाढू लागली आहे. गांजा विक्रेत्यांचे जाळे राज्यभर पसरले असून त्याचे सूत्रधार राज्याबाहेरचे असल्याचे समोर येत आहे. मुंब्रा मार्गावर पकडलेला गांजा देखील आंध्र प्रदेशमधून आणण्यात आलेला होता. तो पकडला जावू नये याकरिता महागड्या स्कोडा कारमधून त्याची वाहतूक केली जात होती. मात्र गुन्हे शाखा पोलिसांना त्याची खबर मिळाल्याने सापळा रचून कारवाई केली. आरोपींना न्यायालयाने गुरुवारपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: 100 kg of ganja seized from Panvel, arrested three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल