श्रीवर्धनमध्ये संपाला १०० टक्के प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 06:56 AM2017-10-18T06:56:59+5:302017-10-18T06:56:59+5:30

100% Response to Shrivardhan | श्रीवर्धनमध्ये संपाला १०० टक्के प्रतिसाद

श्रीवर्धनमध्ये संपाला १०० टक्के प्रतिसाद

Next

श्रीवर्धन : श्रीवर्धन आगारातील कर्मचारी वर्गाने विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, विदर्भ एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) कनिष्ठ वेतनश्रेणी संघटना व संघर्ष ग्रुप यांच्या कृती समितीने बेमुदत संपाची हाक दिलेली आहे. कामगार वर्गाने संपास १०० टक्के पाठिंबा दिला.
१६ आॅक्टोबरच्या मध्यरात्री १२ वाजता कामगारांनी संपात सहभाग घेण्यास सुरु वात केली. श्रीवर्धन आगारातील ३५० कर्मचारी आहेत. एसटीचा कणा मानले जाणारे चालक-वाहक व यांत्रिक या घटकांनी संपास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे. एसटी कर्मचाºयांनी विविध मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे. मात्र प्रशासन विरु द्ध कर्मचारी यांच्या संघर्षाची सर्वसामान्य जनतेस झळ बसत आहे.
दोन महिन्यांपूर्वी श्रीवर्धन आगारातील १०५ कर्मचाºयांनी परिवहन मंत्र्यांकडे कमी पगाराचे कारण देत ऐच्छिक मरणाचे पत्र दिले होते. त्या कारणे राज्यव्यापी संपात श्रीवर्धन आगाराची भूमिका महत्वाची ठरणार असे दिसते.

संपामुळे मुरुडमध्ये प्रवाशांचे हाल
च्नांदगाव /मुरुड : आगारातील शेकडो कर्मचारी संपात सहभागी झाल्याने शेकडो प्रवासी वर्गाचा प्रवास रखडला. मुरु ड आगारातून एकही एसटी बाहेर न पडल्याने प्रवासी वर्गाला प्रवासच करता आला नाही. परिवहन मंत्र्यांशी बोलणी फिस्कटल्यामुळे आजपासून कमी पगाराच्या विरोधात सर्व कर्मचारी यांनी संपात सहभाग नोंदवला. आज प्रत्येक कार्यालयातील कर्मचाºयास चांगला पगार दिला जातो, मात्र एसटी कर्मचारी वृंदांवर मोठा अन्याय केला जात असल्याची भावना संपात सहभागी कर्मचारी वृंदांनी व्यक्त केली.
च्एखादी गाडी लांब ठिकाणी गेल्यास तिथे वस्ती करावी लागते. अशा वस्तीचे दर कल्याण वस्ती ९ रु पये, मुंबई व ठाणे वस्ती १५ ते २० रु पये, पुणे वस्ती १५ ते २० रु पये अशा कमी पैशातही चांगली सेवा देत असताना महामंडळाकडून पगारवाढ व्हावी अशी अपेक्षा सचिव श्रीराम राठोड यांनी व्यक्त केली आहे.

एसटी सेवा ठप्पचा प्रवाशांना भुर्दंड
रेवदंडा : एसटी संघटनेने पुकारलेल्या संपामुळे एसटीची सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसून प्रवास करावा लागला तर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी निघालेले प्रवासी एसटी संपाच्या हाकेने वैतागून गेले. अनेक शासकीय कर्मचाºयांना खासगी वाहनाने प्रवास करून कार्यालय गाठले तर काहींना दांडी मारावी लागली. पर्यटक यांना संपाची झळ पोचली.

प्रवाशांचे हाल
कार्लेखिंड : राज्यातील एसटी कर्मचाºयांच्या मागण पूर्ण न झाल्याने सोमवारी रात्री बारानंतर पुकारलेल्या संपामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल झाले.
दिवाळी सणासाठी खरेदी आणि शाळांना पडलेल्या सुट्ट्या यामुळे प्रवाशांची कार्लेखिंड पेझारी आणि पोयनाड या मुख्य थांब्यावर गर्दी होती. एसटी बंद मुळे पर्यायी मार्ग म्हणून प्रवाशांना खाजगी बस आणि विक्रम रिक्षांमधून प्रवास करावा लागला.

प्रवाशांचे हाल
कार्लेखिंड : राज्यातील एसटी कर्मचाºयांच्या मागण पूर्ण न झाल्याने सोमवारी रात्री बारानंतर पुकारलेल्या संपामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल झाले.
दिवाळी सणासाठी खरेदी आणि शाळांना पडलेल्या सुट्ट्या यामुळे प्रवाशांची कार्लेखिंड पेझारी आणि पोयनाड या मुख्य थांब्यावर गर्दी होती. एसटी बंद मुळे पर्यायी मार्ग म्हणून प्रवाशांना खाजगी बस आणि विक्रम रिक्षांमधून प्रवास करावा लागला.

 

Web Title: 100% Response to Shrivardhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.