रिक्षाचालकांना १०१३८ इरादापत्रांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 03:15 AM2018-04-14T03:15:02+5:302018-04-14T03:15:02+5:30

प्रादेशिक परिवहन विभाग पनवेलतर्फे नवीन रिक्षा परवाने वाटप करण्यात येत आहेत. अद्यापपर्यंत तब्बल १० हजार १३८ इरादापत्र रिक्षाचालकांना वाटण्यात आली आहेत.

10138 allotment of intimation to automobiles | रिक्षाचालकांना १०१३८ इरादापत्रांचे वाटप

रिक्षाचालकांना १०१३८ इरादापत्रांचे वाटप

Next

पनवेल : प्रादेशिक परिवहन विभाग पनवेलतर्फे नवीन रिक्षा परवाने वाटप करण्यात येत आहेत. अद्यापपर्यंत तब्बल १० हजार १३८ इरादापत्र रिक्षाचालकांना वाटण्यात आली आहेत. त्यामुळे परिसरात नवीन रिक्षांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. यातील ५ हजार सहाशे ९७ रिक्षाचालकांनी डीडीचे १५ हजार रुपये प्रत्येकी भरलेले आहेत. यापैकी ३ हजार एकशे ६१ जणांना परिमट देण्यात आलेले आहेत. तर काही रिक्षाचालक डीडीचे प्रत्येकी १५ हजार न भरता विनापरिमट रिक्षा चालवत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
प्रादेशिक परिवहन खाते पनवेलच्या अंतर्गत कर्जत, खालापूर, उरण, पनवेल या चार तालुक्यांचा समावेश होतो. चार तालुक्यात पनवेलकरांनी सर्वात जास्त रिक्षांचे इरादपत्रे घेतली आहेत. त्यामुळे नवीन रिक्षा घेण्यासाठी बहुतांशी चालक वेटिंगवर आहेत. दररोज परिसरातील रस्त्यांवर नवीन रिक्षांची भर पडत आहे. वाढत्या रिक्षांच्या तुलनेने रिक्षाथांब्याची संख्या कमी आहे. त्यामुळे काही नवीन रिक्षाचालकांना जागा मिळेल तिथे आपली रिक्षा लावावी लागते. काही रिक्षाचालकांनी १५ हजार रुपये भरलेले नसल्याने त्यांना परमिट देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे विनापरमिट रिक्षा चालविणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. अशा रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. शहराच्या वाढत्या वाहनांच्या संख्येत आणखी रिक्षांची भर पडत असल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम होत आहे.
>विना परमिट रिक्षा चालविणाºयांवर कारवाई सुरूच आहे. जोपर्यंत रिक्षाचालक डीडी भरत नाहीत, तोपर्यंत त्यांना आरसी बुक व परिमट दिले जात नाही.
- हेमांगिनी पाटील,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल

Web Title: 10138 allotment of intimation to automobiles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.