१०४ वर्षे जुना पत्रीपूल रविवारी पाडणार; लोकल बंद राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 03:45 AM2018-11-17T03:45:48+5:302018-11-17T03:46:19+5:30

लोकल धावणार नसल्याने रस्तेवाहतुकीवर ताण

104-year-old father will make Sunday; Local will remain closed | १०४ वर्षे जुना पत्रीपूल रविवारी पाडणार; लोकल बंद राहणार

१०४ वर्षे जुना पत्रीपूल रविवारी पाडणार; लोकल बंद राहणार

Next

कल्याण : ब्रिटिशकालीन १०४ वर्षे जुना व धोकादायक बनलेला पत्रीपूल रविवारी पाडण्यासाठी मध्य रेल्वे सहा तासांचा विशेष ब्लॉक घेणार आहे. त्यामुळे कल्याण ते डोंबिवली रेल्वेस्थानकांदरम्यान एकही लोकल धावणार नसल्याने रस्ते वाहतुकीवर त्याचा ताण येणार आहे. त्यामुळे ही वाहतूक सुरळीत राहावी तसेच प्रवाशांचे हाल होऊ नये, यासाठी केडीएमटी, एसटी आणि वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे.

मेगाब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते डोंबिवली तसेच कल्याण ते कसारा-कर्जतदरम्यान रेल्वेची वाहतूक सुरू राहणार आहे. तर, कल्याण-डोंबिवलीदरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णत: बंद असेल. ब्लॉकचा कालावधी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० असा सहा तासांचा असल्याने या वेळेत प्रवाशांचे मेगाहाल होण्याची शक्यता आहे. पूल पाडण्यासाठी रेल्वे प्रशासनाची जोरदार तयारी सुरू झाली. मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्री घटनास्थळी आणण्यात आली आहे. अन्य यंत्रणाही या मोहिमेसाठी सज्ज झाल्या आहेत. केडीएमटी, एसटी महामंडळ, वाहतूक पोलीस, शहर पोलीस या विभागांनी त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी यांना विशेष सूचना दिल्या आहेत.
पत्रीपूल पाडण्यासाठी मोठमोठ्या व अद्ययावत मशीन आणण्यात आल्या आहेत. त्या महाकाय मशीन बघण्यासाठी शुक्रवारपासूनच जुन्या पत्रीपूल परिसरात गर्दी होऊ लागली आहे.

रविवारी या एक्स्प्रेस रद्द
ट्रेन क्रमांक नाव
१२११८ मनमाड-एलटीटी एक्स्प्रेस
१२११७ एलटीटी-मनमाड एक्स्प्रेस
१२११० मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस
१२१०९ मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस
५११५४ भुसावळ-मुंबई पॅसेंजर
५११५३ मुंबई-भुसावळ (१९ नोव्हेंबर)

ब्लॉकपूर्वी रविवारी सकाळी उपलब्ध असलेल्या लोकल
च्सीएसएमटी येथून कर्जतसाठी ८ वाजून १६ मिनिटांची जलद लोकल
च्दादर येथून टिटवाळ्यासाठी ८ वाजून ७ मिनिटांची धिमी लोकल
च्कल्याण येथून सीएसएमटीसाठी ९ वाजून ९ मिनिटांची जलद लोकल
च्कल्याण येथून सीएसएमटीसाठी ९ वाजून १३ मिनिटांची धिमी लोकल

‘प्राइम’ एक्स्प्रेसलाही बसणार फटका
रविवारी ट्रेन क्रमांक ११०१०-११००९ पुणे-मुंबई-पुणे सिंहगड आणि १२१२४-१२१२३ पुणे-मुंबई-पुणे दख्खन ची राणीसह १२०७२-१२०७१ जालना-दादर-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस ब्लॉकमुळे रद्द करण्यात आल्या आहेत.

Web Title: 104-year-old father will make Sunday; Local will remain closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.