काँक्रीटीकरणासाठी ११ कोटींची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 05:03 AM2018-08-27T05:03:16+5:302018-08-27T05:03:44+5:30

दुरुस्तीसाठी चार महिने : फूडलँड ते तळोजा एमआयडीसी बायपास

11 crore clearance for concretization for pathole road in thane | काँक्रीटीकरणासाठी ११ कोटींची मंजुरी

काँक्रीटीकरणासाठी ११ कोटींची मंजुरी

Next

तळोजा : तळोजा एमआयडीसीपासून कळंबोली फूडलँड ते क्र ाउन कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सिडकोकडून देण्यात आली आहे.

कळंबोली फूडलँडपासून सुरू होणाºया उड्डाणपुलाच्या उतरणीला मोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागते. आता या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. ठेकेदाराने यापूर्वी मार्गावर बारीक खडी टाकली होती. मात्र, पावसामुळे खडी निघून गेली आहे. खड्ड्यात चिखल साचल्याने वाहनांचे अपघात होत आहेत. तळोजा औद्योगिक वसाहतीत प्रवेश करण्यासाठी कळंबोलीतील पर्यायी मार्गाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो, त्यामुळे या मार्गावर दिवसरात्र वर्दळ असते. सिडकोकडून या रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी ११ कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. कळंबोली, पनवेल, कामोठे या भागातून पूर्वी तळोजाकडे जाण्यासाठी नावडे फाटा येथून प्रवास करावा लागत होता. मात्र, बायपासमुळे वेळ व इंधनाची बचत होत आहे. मात्र, खड्ड्यांमुळे हा मार्ग जीवघेणा ठरत असल्याचे चालकांचे म्हणणे आहे.

कंळबोली फूडलँड कंपनीपासून तळोजा एमआयडीसीकडे जाणाºया रस्त्यावर खड्ड्यांवर खडी टाकता येत नाही, त्यामुळे लवकरच काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. यासाठी निविदा मंजूर करण्यात आली असून, कामाला तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागू शकतो.
- संजय पाटील, उपअभियंता सिडको

Web Title: 11 crore clearance for concretization for pathole road in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.