चार वर्षांत ११ लाख पर्यटकांची भेट
By Admin | Published: November 17, 2016 06:42 AM2016-11-17T06:42:55+5:302016-11-17T06:42:55+5:30
महापालिकेच्या नेरूळमधील वंडर्स पार्कला पर्यटकांची सर्वाधिक पसंती मिळू लागली आहे.
नवी मुंबई : महापालिकेच्या नेरूळमधील वंडर्स पार्कला पर्यटकांची सर्वाधिक पसंती मिळू लागली आहे. चार वर्षांमध्ये १० लाख ८५ हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. लग्न व इतर कार्यक्रमांसाठीही हजारो नागरिक उपस्थित राहत असतात. शहरातील विरंगुळ्याचे प्रमुख केंद्र म्हणून हे उद्यान ओळखले जात असून उद्घाटनापासून प्रवेश शुल्क व हायटेक राईडच्या माध्यमातून तब्बल साडेपाच कोटी रुपये महसूल संकलित झाला आहे.
मनपाने उभारलेल्या वंडर्स पार्कचे उद्घाटन डिसेंबर २०१२ मध्ये झाले. पहिल्या दिवसापासून उद्यानाला भेट देण्यासाठी शहरवासीयांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. उद्यान सुरू झाल्यापासून आतापर्यंत ८ लाख ५२ हजार प्रौढ नागरिक व २ लाख ३३ हजार लहान मुलांनी उद्यानास भेट दिली आहे. (प्रतिनिधी)