नवी मुंबई : देशातून प्रत्येक वर्षी ११ हजार मुले बेपत्ता होतात. बाल लैंगिक अत्याचारामध्ये जगात पहिला व महिला अत्याचारामध्ये चौथ्या क्रमांकावर येत असल्याची खंत सामाजिक कार्यकर्त्या प्राजक्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये सतीश हावरे यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त अहमदनगरमधील स्रेहालय संस्थेच्या डॉ. गिरीश कुलकर्णी व प्राजक्ता कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी प्राजक्ता यांनी लैंगिक अत्याचाराविषयीच्या भयाण वास्तवावर लक्ष वेधले. देशात बलात्काराची घटना झाली की मोर्चे काढले जातात. पीडित मृत तरूणीला श्रद्धांजली अर्पण केली जाते. काही दिवसांनी सर्व शांत होते. परंतु पीडित मुलीच्या पालकांच्या मनावरील जखमा कधीच भरून निघत नाहीत. प्रत्येक वर्षी ११ हजार मुले बेपत्ता होत आहेत. बाललैंगिक व महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अत्याचाराच्या वाढणाऱ्या घटना पाहिल्या की समाजाचा सुसंस्कृतपणा तपासून पाहण्याची वेळ आली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. गिरीश कुलकर्णी यांनी स्रेहालयच्या वाटचालीविषयी माहिती दिली. प्रत्येकाने बदलाची सुरवात स्वत:पासून करावी. समाजात संस्काराची कमी असून ती भरून काढली पाहिजे. तरूणांना प्रेरणा देवून चांगल्या कार्यासाठी प्रवृत्त करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी दुसºयांसाठी जगता आले पाहिजे असे मत व्यक्त केले. कॅम्लीनचे सुभाष दांडेकर यांनीही स्रेहालयच्या व हावरे परिवाराच्या कार्याचे कौतुक केले.कार्यक्रमास शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, संजय हावरे, प्रवीण हावरे, उज्ज्वला हावरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तरा मोने यांनी केले.स्नेहालयचा आदर्शसतीश हावरे यांच्या १३व्या स्मृतिदिनानिमित्त स्रेहालयच्या कुलकर्णी दाम्पत्याला जीवनगौरव पुरस्कार, स्मृतिचिन्ह व १ लाख रुपये रोख रक्कम देण्यात आली. स्रेहालय अहमदनगरमध्ये ३० वर्षांपासून देहविक्रय करणाºया महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करत आहे. स्रेहांकुर दत्तक विधान केंद्राच्या माध्यमातून ७३० बालके विविध कुटुंबामध्ये पुनर्वसित झाली आहेत. ४१७ कुमारी माता, बलात्कारित महिलांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. स्रेहाधार प्रकल्पाच्या माध्यमातून २२ हजार महिलांना सहकार्य केले आहे. स्रेहज्योत योजनेअंतर्गत ३४०० महिलांना लाभ देण्यात आला आहे. मुक्तीवाहिनी पथकाच्या माध्यमातून २०० प्रकरणात आरोपींना शिक्षा दिली आहे.
देशात दरवर्षी ११ हजार मुले बेपत्ता, प्राजक्ता कुलकर्णींनी मांडले वास्तव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 6:58 AM