११ हजार प्रकल्पग्रस्तांना विकसित भूखंड मिळणार; सिडको आणि जेएनपीटी यांच्यात सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:43 PM2021-01-22T16:43:05+5:302021-01-22T16:47:50+5:30

हे भूखंड विकसित करण्याचा संपूर्ण खर्च जेएनपीटी करणार असून सिडकोच्या माध्यमातून हे भूखंड प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना हस्तांतरित करण्यात येणार आहेत.

11,000 project affected people will get plots; Memorandum of Understanding between CIDCO JNPT | ११ हजार प्रकल्पग्रस्तांना विकसित भूखंड मिळणार; सिडको आणि जेएनपीटी यांच्यात सामंजस्य करार

११ हजार प्रकल्पग्रस्तांना विकसित भूखंड मिळणार; सिडको आणि जेएनपीटी यांच्यात सामंजस्य करार

Next

मुंबई – जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टसाठी (जेएनपीटी) सिडकोने अधिग्रहित केलेल्या जमिनींच्या बदल्यात तब्बल ११ हजार प्रकल्पग्रस्तांना साडे बारा टक्के विकसित भूखंड परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सिडकोने यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण केली असून जेएनपीटी आणि सिडको यांच्यात यासंदर्भात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हे भूखंड विकसित करण्याचा संपूर्ण खर्च जेएनपीटी करणार असून सिडकोच्या माध्यमातून हे भूखंड प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना हस्तांतरित करण्यात येणार आहेत.

Web Title: 11,000 project affected people will get plots; Memorandum of Understanding between CIDCO JNPT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.