शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

तरघर स्थानकाच्या उभारणीसाठी ११२ कोटींचा खर्च, ३0 महिन्यात होणार काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 3:25 AM

नवी मुंबई : नेरूळ-उरण रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. साधारण डिसेंबर २0१७ मध्ये पहिल्या टप्यातील मार्गावर रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.

नवी मुंबई : नेरूळ-उरण रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. साधारण डिसेंबर २0१७ मध्ये पहिल्या टप्यातील मार्गावर रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यानुसार स्थानकांच्या कामाला गती देण्यात आली आहे. या मार्गावरील तारघर स्थानकाची निर्मित्ती अत्याधुनिक पध्दतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी ११२ कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत. हे स्थानक या मार्गावरील विशेष आकर्षण ठरेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.सिडकोने जुलै १९९७ मध्ये नेरूळ-उरण या २७ किमी लांबीच्या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु विविध कारणांमुळे हा प्रकल्प कागदावरच सीमित राहिला होता. अखेर जून २0१२ पासून या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. सिडको व रेल्वे यांच्या संयुक्त सहकार्याने उभारण्यात येत असलेल्या या मार्गावर १0 स्थानके आहेत, तर या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च दोन हजार कोटींच्या घरात आहे. या संपूर्ण मार्गावर चार उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यापैकी उलवे खाडीवरील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. सध्या या मार्गावरील पाचव्या क्रमांकाच्या खारकोपर स्थानकाचे काम पूर्ण होत आले आहे. तर त्यापुढील चार किलोमीटरच्या पट्ट्यात खारफुटी व भूसंपादनाचा अडथळा निर्माण झाल्याने हे काम रखडले होते. परंतु आता हा अडथळाही दूर झाल्याने पुढील टप्यासाठी सिडकोने कंबर कसली आहे. दरम्यान, या मार्गावरील नियोजित रेल्वे स्थानके उभारण्यावर सिडकोने भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सागरसंगम स्थानकानंतर पहिल्या क्रमांकाचे तरघर स्थानक अत्याधुनिक दर्जाचे करण्याचा सिडकोचा मानस आहे. त्यादृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या स्थानकाच्या उभारणीसाठी ११२ कोटी १२ लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.बी.जी.बेलेकर कंपनीला हे कंत्राट दिले असून काम पूर्ण करण्यासाठी ३0 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.या मार्गावरील तरखर हे भव्य व दिव्य रेल्वेस्थानक ठरणार आहे. यात २७0 मीटर लांबीचे चार फलाट प्रस्तावित करण्यात आले आहेत. स्थानकाच्या इमारतीत वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, सीबीडी स्थानकाच्या धरतीवर वाणिज्य कॉम्प्लॅक्स उभारले जाणार आहे. यात विविध कार्यलयांसह दोन तिकीट कार्यालये असणार आहेत. तर स्थानकाच्या पहिल्या मजल्यावर प्रशस्त वाहनतळ प्रस्तावित करण्यात आले असून वाहनतळावर जाण्यासाठी रॅम्पची सुविधा असणार आहे. एकूणच तरघर स्थानक नेरूळ-उरण मार्गावरील वास्तुशिल्पाच्या दृष्टीने एक आकर्षण ठरेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.>नेरूळ-उरण मार्गावर एकूण १0 रेल्वे स्थानके आहेत. यात नेरूळ-सीवूड्स, सागरसंगम, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर गव्हाण, रांजणपाडा, न्हावा-शेवा, डोंगरी व उरण या स्थानकांचा समावेश आहे. सध्या पहिल्या टप्यातील पाच स्थानकापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित पाच स्थानकांची कामे भूसंपादनाअभावी रखडली आहे. आता भूसंपादनाचा तिढाही सोडविण्याच्या दृष्टीने सिडकोने हलचाली सुरू केल्याने लवकरच हा प्रकल्प पुर्णत्वास येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.>तरघर स्थानकाची उपयुक्तताशिवडी-न्हावाशेवा सी-लिंक या प्रकल्पाला जोडला जाणारा कोस्टल रोड तरघर स्थानकाला लागूनच असलेल्या पामबीच मार्गाला जोडला जाणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील खांदेश्वर स्थानकापासून नियोजित तरघर स्थानकादरम्यान स्कायट्रेन सुरू करण्याची योजना आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतून नवी मुंबईत येण्यासाठी तरघर हे केंद्रबिंदू ठरणार आहे.>डिसेंबर २0१७ मध्ये पहिला टप्पासध्या या मार्गावरील पाचव्या क्रमांकाच्या खारकोपर स्थानकापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पहिल्या टप्यात डिसेंबर २0१७ मध्ये खारकोपरपर्यंत रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्धार सिडकोने केला आहे. त्यानुसार कामाला गती देण्यात आली आहे.