बेस्टकडून ११८ बसची खरेदी रद्द

By admin | Published: June 16, 2017 02:47 AM2017-06-16T02:47:08+5:302017-06-16T02:47:08+5:30

बेस्ट बचावसाठी तयार केलेला आराखडा वादात सापडल्याने पालिकेकडून मिळणारी मदतही लांबणीवर पडली. यामुळे बेस्ट खरेदी करीत असलेल्या ३०३ बसगाड्यांपैकी

118 purchase canceled from BEST | बेस्टकडून ११८ बसची खरेदी रद्द

बेस्टकडून ११८ बसची खरेदी रद्द

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बेस्ट बचावसाठी तयार केलेला आराखडा वादात सापडल्याने पालिकेकडून मिळणारी मदतही लांबणीवर पडली. यामुळे बेस्ट खरेदी करीत असलेल्या ३०३ बसगाड्यांपैकी ११८ बसची खरेदी रद्द करण्याची नामुष्की बेस्ट प्रशासनावर ओढावली आहे. ५७ कोटी रुपये उभे करणे शक्य नसल्याने या बसगाड्यांची मागणी रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे बस स्थानकावरील प्रवाशांची प्रतीक्षा वाढणार आहे. त्याचवेळी या संकटातून बाहेर पडण्यासाठी पालिका प्रशासनाला गळ घालण्याचे प्रयत्नही बेस्ट समितीने सुरू ठेवले आहेत.
मुंबई महापालिकेने दिलेल्या ९० कोटी रुपयांच्या अनुदानातून बेस्टने
३०३ बसगाड्या टाटाकडून
खरेदी करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली होती. या बसगाड्यांसाठी बेस्ट उपक्रम टाटा कंपनीला १५३ कोटी रुपये
देणार आहे. यापैकी पालिकेकडून
९० कोटी रुपयांचा पहिला
हफ्ता बेस्टला मिळाला. तर ५७ कोटी रुपये बेस्टला स्वत: उभे करायचे
होते. ३० मार्चपर्यंत बस खरेदी
केल्यास आर्थिक मदतीची तयारी पालिकेने दाखवली होती.
मात्र या बसगाड्यांची खरेदी लांबणीवर पडली, याच दरम्यान दिलेली मुदत संपल्यामुळे पालिका प्रशासनाने हात आखडते घेतले
आहेत. त्यामुळे बस खरेदीचा बेस्टचा प्रयत्न फसला आहे. आर्थिक स्थिती नाजूक असल्याने ही खरेदी रद्द करण्याची वेळ बेस्ट प्रशासनावर आली आहे. याबाबतचा प्रस्ताव बेस्ट समितीच्या पटलावर लवकरच चर्चेसाठी येणार आहे.

अशा आहेत मागण्या
आर्थिक मदत मिळावी, कर्जाचे व्याज दर कमी असावे, बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, पालिका आकारत असलेल्या विविध करांतून सूट मिळावी.

सर्वपक्षीय सदस्य सोमवारी आयुक्तांच्या भेटीला
बेस्ट उपक्रमाने मदतीसाठी महापालिकेला साकडे घातले होते. त्यानुसार आर्थिक मदत करण्याची तयारी पालिका आयुक्तांनी दाखवली होती. मात्र तत्पूर्वी त्यांनी बेस्ट उपक्रमाला बेस्ट बचावाचा कृती आराखडा तयार करण्याची अट घातली. मात्र हा आराखडा वादात सापडून रखडला आहे. कर्मचारी व त्यांच्या भत्त्यांमध्ये कपात करण्याच्या शिफारशींना विरोध दर्शवीत हा आराखडा बेस्ट समितीने नामंजूर केला आहे. त्यामुळे बेस्टची आर्थिक अडचण वाढली आहे. यामुळे मदत मिळवण्यासाठी बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ व सर्वपक्षीय सदस्य सोमवारी पालिका आयुक्तांची भेट घेणार आहेत.

- बेस्टच्या ताफ्यात ४८०० बसगाड्या होत्या
- सध्या बस ताफा ३७०० आहे
- यापैकी ३५०० बसगाड्या रस्त्यावर धावतात
- ३०३ नवीन बसगाड्या बेस्ट खरेदी करणार होती
- ११८ बसगाड्यांची आॅर्डर रद्द करण्यात येणार आहे

Web Title: 118 purchase canceled from BEST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.