नवी मुंबईत उभे राहणार 12 मजल्यांचे देखणे महाराष्ट्र भवन, नियोजित वास्तूचे सादरीकरण, सुसज्ज सुविधांची रेलचेल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 12:25 PM2023-09-13T12:25:06+5:302023-09-13T12:25:52+5:30

Navi Mumbai: महाराष्ट्र शासनाकडून नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकासमोर बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवनाची नियोजित इमारत ही १२ माळ्यांची राहणार असून त्यात सर्व सुविधा असणार आहेत.

12-storey handsome Maharashtra Bhavan to be erected in Navi Mumbai, presentation of planned architecture, train of well-equipped facilities | नवी मुंबईत उभे राहणार 12 मजल्यांचे देखणे महाराष्ट्र भवन, नियोजित वास्तूचे सादरीकरण, सुसज्ज सुविधांची रेलचेल

नवी मुंबईत उभे राहणार 12 मजल्यांचे देखणे महाराष्ट्र भवन, नियोजित वास्तूचे सादरीकरण, सुसज्ज सुविधांची रेलचेल

googlenewsNext

नवी मुंबई - महाराष्ट्र शासनाकडून नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकासमोर बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवनाची नियोजित इमारत ही १२ माळ्यांची राहणार असून त्यात सर्व सुविधा असणार आहेत. या नियोजित महाराष्ट्राच्या वास्तूचे सादरीकरण सिडकाेचे उपाध्यक्ष  व व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांच्या दालनात करण्यात आले. याचा पाठपुरावा करणाऱ्या बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, सिडकोचे  सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल, कैलास शिंदे यावेळी उपस्थित होते.

नियोजित महाराष्ट्र भवनामध्ये व्हीआयपी रूम, तसेच लोकप्रतिनिधीसोबत येणारे त्यांचे वाहनचालक किंवा कर्मचाऱ्यांकरिता ही रूम असणार आहे. त्याचबरोबर विविध भागांतून येणाऱ्या विद्यार्थी, अभ्यागतांसाठी विश्रांती कक्ष, ई- लायब्ररी, कॉन्फरन्स हॉल, फूड प्लाझा अशा विविध प्रकारच्या सुविधा या महाराष्ट्र भवनामध्ये पाहावयास मिळणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र भवनाचा प्रश्न हा लवकरात लवकर मार्गी लागल्यामुळे अशी वास्तू प्रथमच राज्यामध्ये उभी राहणार आहे.  शहरवासीयांना सिडकोमार्फत वाशी येथे राज्यनिहाय भवन निर्मितीसाठी भूखंड उपलब्ध करून दिले गेले. 

१०० कोटींची तरतूद
नियोजित महाराष्ट्र भवनासाठी महाविकास आघाडी सरकारमध्ये वित्तमंत्री असताना सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १०० कोटींच्या तरतुदीची घाेषणा केली होती. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष सहकार्य केले आहे. 

 महाराष्ट्र भवनाच्या प्रथमदर्शनी भागामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने भवनामध्ये प्रवेश करताच छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन होऊन त्यानंतरच महाराष्ट्राची आठवण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 राज्यनिहाय दिल्या गेलेल्या सर्व राज्यांची भवने नवी मुंबई वाशी येथे उभी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र अशा विविध ठिकाणांहून येणाऱ्या नागरिकांना दिलासा. 

लढ्याला यश
ज्या महाराष्ट्र भवनासाठी २०१४ पासून जो लढा चालला होता त्याला आज पूर्णविराम लागला असून या महाराष्ट्र भवनाचा फायदा हा नवी मुंबईलाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र राज्याला होणार असल्याचे आमदार म्हात्रे यांनी सांगितले.

 

Web Title: 12-storey handsome Maharashtra Bhavan to be erected in Navi Mumbai, presentation of planned architecture, train of well-equipped facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.