सिडकोच्या घरांसाठी १२ हजार अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 01:28 PM2024-10-14T13:28:48+5:302024-10-14T13:29:15+5:30
सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईच्या विविध नोड्समध्ये ६७ हजार घरे निर्माण केली जात आहेत.
नवी मुंबई : सिडकोच्या २६ हजार घरांची योजना जाहीर झाली आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर १२ ऑक्टोबरपासून ‘माझे पसंतीचे घर’ या याेजनेंतर्गत ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली. गेल्या २४ तासांत १२ हजार ४०० ग्राहकांनी घरासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी केली आहे. त्यामुळे पुढील दिवसांत या योजनेतील घरांसाठी विक्रमी प्रतिसाद असेल, असा विश्वास सिडकोच्या संबंधित विभागाने व्यक्त केला आहे.
सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईच्या विविध नोड्समध्ये ६७ हजार घरे निर्माण केली जात आहेत. यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १३ हजार, तर अल्प उत्पन्न गटासाठी १३ हजार घरांचा समावेश आहे. माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेंतर्गत ११ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. आर्थिकदृष्ट्या घटकांसाठी उत्पन्न मर्यादा वार्षिक ६ लाखांपर्यंत, तर अल्प उत्पन्न गटासाठी उत्पन्न मर्यादा ६ लाखांपेक्षा जास्त असणे बंधनकारक आहे.