शहरात १२५ कृत्रिम तलावांची होणार निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 01:21 AM2020-08-16T01:21:47+5:302020-08-16T01:21:57+5:30

या वर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार असला, तरी कृत्रिम तलावांची भर पडल्यामुळे नागरिकांची गैरसोय आणि विसर्जन स्थळावर गर्दी टळणार आहे.

125 artificial lakes will be constructed in the city | शहरात १२५ कृत्रिम तलावांची होणार निर्मिती

शहरात १२५ कृत्रिम तलावांची होणार निर्मिती

Next

योगेश पिंगळे 
नवी मुंबई : गणपती विसर्जन काळात नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी नवी मुंबई महापालिका, नवी मुंबई पोलीस आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने शहरात १२५ कृत्रिम तलावांची निर्मिती केली जाणार आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर या वर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार असला, तरी कृत्रिम तलावांची भर पडल्यामुळे नागरिकांची गैरसोय आणि विसर्जन स्थळावर गर्दी टळणार आहे.
२५ जुलै रोजी आठही विभागीय स्तरावर महापालिका व पोलीस अधिकारी यांच्यासह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. विसर्जनाच्या दिवशी गर्दी न होण्याच्या दृष्टीने सर्व विभागांमध्ये नागरिकांना सोयीचे ठरेल, अशा जागांवर जास्त संख्येने कृत्रिम तलाव निर्माण करावेत, तसेच तलावातील पाणीव्यवस्था, पूजा व आरतीसाठी टेबल्स, विसर्जनासाठी स्वयंसेवक व्यवस्था अशा बाबींकडेही लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. या दृष्टीने सर्व विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी संबंधित विभागाचे सहायक आयुक्त आणि पोलीस अधिकारी यांच्या समन्वयाने शहरातील आठही विभागांतील जागांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, कृत्रिम तलावांच्या निर्मितीसाठी १२५ जागा निच्छित करण्यात आल्या आहेत.
या वर्षी शहरातील काही मंडळांनी दहा दिवसांऐवजी दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. नवी मुंबई शहरात महापालिकेची २३ विसर्जन स्थळे असून, त्यामध्ये १२५ कृत्रिम तलावांची भर पडणार असून, १४८ विसर्जन स्थळे निर्माण होणार आहे.

Web Title: 125 artificial lakes will be constructed in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.