घणसोलीत १२९ ज्येष्ठांचा सामायिक वाढदिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 03:18 AM2018-06-29T03:18:29+5:302018-06-29T03:18:34+5:30

स्वातंत्र्यासाठी मिठाचा सत्याग्रह, जंगल सत्याग्रह अशी अनेक आंदोलने करून ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाऱ्या घणसोली गावाची स्वातंत्र्यसैनिकांचे गाव म्हणून ओळख आहे.

129 Senior Birthday celebrities in Ghansoli | घणसोलीत १२९ ज्येष्ठांचा सामायिक वाढदिवस

घणसोलीत १२९ ज्येष्ठांचा सामायिक वाढदिवस

Next

नवी मुंबई : स्वातंत्र्यासाठी मिठाचा सत्याग्रह, जंगल सत्याग्रह अशी अनेक आंदोलने करून ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाऱ्या घणसोली गावाची स्वातंत्र्यसैनिकांचे गाव म्हणून ओळख आहे. अशा ऐतिहासिक गावातील ज्येष्ठांचा सामायिक वाढदिवस गुरुवारी साजरा केला. या कार्यक्रमाला महापौर जयवंत सुतार यांची विशेष उपस्थिती लाभली होती.
घणसोली गावातील ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेच्यावतीने १२९ ज्येष्ठ नागरिकांचा सामायिक वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी ज्ञानविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.पी.सी.पाटील, महाराष्टÑ कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील, ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्रनाथ म्हात्रे, स्वीकृत नगरसेवक घनश्याम मढवी, उपाध्यक्ष श्याम पाटील, विनायक मढवी, बाबूरावबुवा पाटील, नारायण रानकर, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रेय नागरे, सावित्री महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निर्मला रानकर आदी उपस्थित होते.
यावेळी प्लॅस्टिकबंदीची घोषणा देत उपस्थित नागरिकांना कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले. घणसोलीत सर्वात वयोवृद्ध असलेल्या ९१ वर्षीय ह.भ.प.शांतारामबुवा म्हात्रे यांचा महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: 129 Senior Birthday celebrities in Ghansoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.