उरण तालुक्यात बारावीचा निकाल ९३.२२ टक्के : दोन शाळांचा निकाल १०० टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 03:59 PM2024-05-21T15:59:37+5:302024-05-21T16:01:06+5:30

उरण तालुक्यात बारावीचा निकाल ९३.२२ टक्के लागला असल्याची माहिती  उरण गटशिक्षणाधिकारी प्रियांका पाटील यांनी दिली. उरण तालुक्यातील १३ शाळांमधुन बारावीच्या परीक्षेत २०५३ विद्यार्थी बसले होते.यापैकी १९१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  

12th result in Uran taluk 93.22 percent: Two schools result 100 percent | उरण तालुक्यात बारावीचा निकाल ९३.२२ टक्के : दोन शाळांचा निकाल १०० टक्के

उरण तालुक्यात बारावीचा निकाल ९३.२२ टक्के : दोन शाळांचा निकाल १०० टक्के

मधुकर ठाकूर

उरण : उरण तालुक्यात बारावीचा निकाल ९३.२२ टक्के लागला असल्याची माहिती  उरण गटशिक्षणाधिकारी प्रियांका पाटील यांनी दिली.
उरण तालुक्यातील १३ शाळांमधुन बारावीच्या परीक्षेत २०५३ विद्यार्थी बसले होते.यापैकी १९१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  

उरण तालुक्यातील  युईएस-९९.७८ टक्के, सिटिझन हायस्कूल -ज्युनिअर कॉलेज उरण-९९.३८ टक्के,  स्वातंत्र्य वीर सावरकर महाविद्यालय नवीन शेवा -८२ टक्के,रामदास नारायण ठाकूर कला उच्च माध्यमिक विद्यालय दिघोडे-८३.५८ टक्के,नेटिव्ह इन्स्टिट्यूशन उरण- ६९.२३ टक्के,रोटरी इंग्लिश मिडीयम बोरी-उरण ९९.१७ टक्के,छत्रपती शिवाजी हायस्कूल व दि.बा.पाटील ज्युनिअर कॉलेज जासई-९३.५२ टक्के, काळूशेठ खारपाटील उच्च माध्यमिक शाळा चिरनेर- ८१.८१ टक्के,पांडुरंग चांगु पाटील उच्च माध्यमिक विद्यालय चाणजे- १०० टक्के,रामचंद्र म्हात्रे ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स कॉलेज आवरे -९०.८४ टक्के, तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे-९७.८३ टक्के,कर्मवीर भाऊराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालय- रकोन-८३.३३ टक्के, सेंट मेरीज ज्युनियर कॉलेज -उरण सिटीझन ज्युनियर कॉलेज  उरण -१०० टक्के आदी १३ शाळांचा निकाल लागला आहे.मागील शैक्षणिक वर्षात १३ पैकी १२ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला होता.या शैक्षणिक वर्षात मात्र फक्त दोन शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

Web Title: 12th result in Uran taluk 93.22 percent: Two schools result 100 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.