शहरातील १३ शाळा अनधिकृत

By admin | Published: June 10, 2015 04:07 AM2015-06-10T04:07:32+5:302015-06-10T04:07:32+5:30

शाळेच्या अ‍ॅडमिशनपासून ते शालेय साहित्यांपर्यंत सर्वच तयारी झाल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेने १३ अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी जाहीर केली.

13 schools in the city are unauthorized | शहरातील १३ शाळा अनधिकृत

शहरातील १३ शाळा अनधिकृत

Next

नवी मुंबई : शाळेच्या अ‍ॅडमिशनपासून ते शालेय साहित्यांपर्यंत सर्वच तयारी झाल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेने १३ अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी जाहीर केली. निकाल लागण्यापूर्वी ही यादी लागणे आवश्यक असताना लेटलतिफचा शेरा मिळालेल्या पालिकेने या कामातही उशीर केला. पालिकेच्या या कारभारामुळे यादीमधील शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल. नवी मुंबईतल्या बऱ्याचशा शाळा सोमवारपासून सुरु झाल्या आणि शाळेचा पहिला दिवस उलटल्यानंतर महानगरपालिकेला जाग आली. मंगळवारी अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी जाहीर करुन पालकांची चिंता वाढवली आहे. विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक नुकसानाला जबाबदार कोण? असा प्रश्न यादीमधील शाळेत प्रवेश घेतलेल्या पालकांना पडला आहे. पालिकेच्या यादीमुळे पालकांची प्रवेशावेळी होणारी फसवणूक थांबेल, असे मत शहरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

या शाळा अनधिकृत
१.सेंट झेवियर्स स्कूल, नेरुळ, (मराठी) २. श्रीराम हिंदी विद्यालय, शिरवणे,(हिंदी), ३.भारतीय जागरण स्कूल, घणसोली (इंग्रजी), ४.सरस्वती विद्यानिकेतन , घणसोली (इंग्रजी),५.ए.एस.पी. पब्लिक स्कूल (इंग्रजी), ६. सेंट जुडे स्कूल, घणसोली, (इंग्रजी), ७.ज्ञानप्रबोधनी प्रायमरी
इंग्लिश स्कूल, पावणेगाव (इंग्रजी), ८.आॅस्टर इंटरनॅशल स्कूल,कोपरखैरणे (इंग्रजी), ९.एलिम इंग्लिश स्कूल,रबाळे(इंग्रजी), १०.न्यू सिटी इंग्रजी स्कूल, महापेगाव (इंग्रजी),११.नवी मुंबई ख्रिश्चन इंग्लिश स्कूल (इंग्रजी), १२. आदर्श कॉन्व्हेंट स्कूल, महापेगाव(इंग्रजी), १३.लोकमान्य टिळक इंटरनॅशनल स्कूल, कोपरखैरणे(इंग्रजी)

Web Title: 13 schools in the city are unauthorized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.