राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत नमुंमपा शाळांतील १३१ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत 

By नारायण जाधव | Published: September 1, 2022 03:10 PM2022-09-01T15:10:50+5:302022-09-01T15:11:06+5:30

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात येणा-या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2021-22 यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची परंपरा कायम राखली असून 131 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले  झाले आहेत.

131 students from Namumpa schools merit list in National Economically Weaker Factors Scholarship Examination | राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत नमुंमपा शाळांतील १३१ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत 

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत नमुंमपा शाळांतील १३१ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत 

Next

नवी मुंबई -

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात येणा-या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2021-22 यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची परंपरा कायम राखली असून 131 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले  झाले आहेत.
यामध्ये विशेष म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 91, दिवा या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी स्वहम पितांबर पात्रा या विद्यार्थ्याने शिष्यवृत्ती परीक्षेत ठाणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक संपादन करून नवी मुंबई महानगरपालिकेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण व्हिजनचा नावलौकीक उंचाविला आहे.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2021-22 यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या 33 शाळांमधील इयत्ता 8 वीतील 582 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये तब्बल 131 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत मानांकन पटकाविले असून त्यांना दरमहा 1 हजार याप्रमाणे वर्षाला 12 हजार इतकी शिष्यवृत्ती रक्कम मिळाणार आहे. ही शिष्यवृत्ती रक्कम इयत्ता 12 वी पर्यंत या विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे.

याशिवाय महानगरपालिका शाळांतील गुणसंपन्न विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीला आर्थिक बळ मिळावे यादृष्टीने उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा यामध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळविणा-या शिष्यवृत्ती प्राप्त गुणवंत विद्यार्थांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रति महिना रु.600/- इतका आर्थिक लाभ या शैक्षणिक वर्षापासून देण्यास महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मंजूरी दिली आहे. त्यानुसार या 131 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

इयत्ता 8 वी च्या आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला आर्थिक कारणांमुळे अडचणी येऊ नयेत यादृष्टीने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा घेतली जात असून यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल आयुक्त  बांगर यांनी ठाणे जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने शिष्यृत्ती प्राप्त विद्यार्थी स्वहम पात्रा व इतर सर्व गुणवत्ता यादीत मानांकन मिळविणा-या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: 131 students from Namumpa schools merit list in National Economically Weaker Factors Scholarship Examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा