नवी मुंबईत 24 तासात 139 मिमी पाऊस, ट्रान्सफॉर्मर च्या आगीत ५ मोटारसायकल जळाल्या

By नामदेव मोरे | Published: July 22, 2024 10:20 AM2024-07-22T10:20:54+5:302024-07-22T10:21:11+5:30

नवी मुंबई महानगर पालिका कार्यक्षेत्रात रविवारी सकाळी 8.30 ते सोमवारी सकाळी 8.30 चोवीस तास मुसळधार पाऊस सुरू आहे. बेलापूर मध्ये सर्वाधिक 174 मिमी पावसाची नोंद झाली.

139 mm rain in Navi Mumbai in 24 hours; | नवी मुंबईत 24 तासात 139 मिमी पाऊस, ट्रान्सफॉर्मर च्या आगीत ५ मोटारसायकल जळाल्या

नवी मुंबईत 24 तासात 139 मिमी पाऊस, ट्रान्सफॉर्मर च्या आगीत ५ मोटारसायकल जळाल्या

नवी मुंबई:  मुसळधार पावसाने मागील 24 तासात नवी मुंबई ला झोडपले: शहरात 139 मिमी पावसाची नोंद झाली. ऐरोलीत ट्रान्सफॉर्मर ला आग लागून 5 मोटारसायकल जळाल्या. 12 वृक्ष कोसळले. 7 ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. 

नवी मुंबई महानगर पालिका कार्यक्षेत्रात रविवारी सकाळी 8.30 ते सोमवारी सकाळी 8.30 चोवीस तास मुसळधार पाऊस सुरू आहे. बेलापूर मध्ये सर्वाधिक 174 मिमी पावसाची नोंद झाली.दिघा परिसरात सर्वात कमी 104 मिमी पावसाची नोंद झाली. सानपाडा, वाशी, एपीएमसी, ठाणे बेलापूर रोड, इंदिरानगर महापे रोडवर पाणी साचून वाहतूक विस्कळीत झाली.ऐरोली सेक्टर 3 मधील मार्केट जवळ ट्रान्सफॉर्मर ला आग लागून 5 मोटारसायकल जुळल्या.फायर इंजिन च्या हाय प्रेशर च्या सहाय्याने  ही आग विझवली.  आगीत(१) रिक्षा MH 43 R 3634 (2) जुपिटर MH43 CF 5817 (3). मोटर सायकल  MH 43 CD 3419 (४) रिक्षा MH 43 BF 3764 (5) MH 43 AU 650 या मोटारसायकल जळाल्या. 

अतिवृष्टीमुळे  महानगर पालिका प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांनाही खबरदारीच्या सुचना दिल्या आहेत. दुपारी बारापासून High tide alert  दिल्यामुळे ज्या शाळेच्या भागात पाणी भरून विद्यार्थ्यांना येण्या - जाण्याची अडचण होऊ शकते, फक्त अशाच शाळांनी सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना अकरा वाजता शाळेतून सोडण्यात यावे. दुपार सत्रातील अशा ठिकाणच्या शाळांना सुट्टी देण्यात येत असल्याचे कळविले आहे

Web Title: 139 mm rain in Navi Mumbai in 24 hours;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.