१४ डाळ उद्योजकांना दीड कोटींचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 01:21 AM2018-05-20T01:21:11+5:302018-05-20T01:21:11+5:30

या दलालांनी एकाच वेळी तीन ते चार कोटी रुपयांची डाळ मागविली. त्याचे पैसेही वेळेवर दिले.

14 lacs entrepreneurs get one and a half crore | १४ डाळ उद्योजकांना दीड कोटींचा गंडा

१४ डाळ उद्योजकांना दीड कोटींचा गंडा

Next

जळगाव : येथील १४ डाळ उद्योजकांना दीड कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या राकेश उर्फ विशाल प्रफुल्ल ठक्कर याला नवी मुंबईतील वाशी येथून अटक करण्यात आली आहे. प्रकरणात आणखी सहा दलाल आहेत. त्यांची साखळी जळगाव, पुणे, अकोला, यवतमाळ, सोलापूर व राजस्थान, गुजरातमध्ये असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.
या दलालांनी एकाच वेळी तीन ते चार कोटी रुपयांची डाळ मागविली. त्याचे पैसेही वेळेवर दिले. विश्वास संपादन केल्यानंतर उद्योजकांना त्यांनी फसविले. अटक केलेल्या राकेश यास पोलिसांचे पथक पुणे व गुजरातमध्ये घेऊन जाणार आहेत.
दलाल राकेश याने रोहन रमेश प्रभुदेसाई यांच्या माध्यमातून आॅक्टोबर २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत ८५ लाख २६ हजार ८८६ रुपयांची दाळ मागविली होती. त्याने ही दाळ संगम फुड, राजकोट व संगम फुड पुणे येथील व्यापारी नाथाभाई गालाभाई कोडीयातार, नाथाभाई यांची पत्नी,भावेश कोडीयातार (रा.पुणे), गुजरातचे राजू कोडीयातार, भावेन कोडीयातार व किशोर कोडीयातार (सर्व रा. राजकोट, गुजरात) यांच्या माध्यमातून मार्केटमध्ये विक्रीही केली, परंतु जळगावच्या व्यापाºयांना त्याचे पैसेच दिलेच नाहीत. म्हणून राकेशच्या व्यतिरिक्त या सहा जणांविरुध्दही गुन्हा दाखल झाला आहे. राकेशने जळगावातील इतर २४ व्यापाºयांकडून डाळ व मसाला मागविला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांची फसवणूक झाल्याची शंका आहे, असे तपास अधिकारी अतुल वंजारी यांनी सांगितले.

Web Title: 14 lacs entrepreneurs get one and a half crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.