नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने १५व्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त अनुदानातून Dust Mitigation करिता दोन Multipurpose sprayer and Dust suppression Vehicle खरेदी केल्या असून, या वाहनांव्दारे गेल्या तीन महिन्यांमध्ये साधारणत: १४ हजार कि. मी. रस्त्यांवर पाणी फवारणी करून धूळ प्रदूषण कमी केले आहे.
४०० फ्लिपरचा होतोय वापर
याशिवाय शहरात ५ नवीन हवा गुणवत्ता मापन केंद्रे उभारली असून, शहरातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतींवर धूळ प्रतिरोधक म्हणून ग्रीन नेट लावणे बंधनकारक केले आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील रस्ते व पदपथ साफसफाई करण्याकरिता ४०० फ्लिपर मशीनचा प्रतिदिन साधारणत: ४०० रनिंग कि. मी. वापर करून धूळ हटविण्यात येत असल्याचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अर्थसंकल्प सादर करताना स्पष्ट केले आहे.
विकासकांना २२ लाख दंडाच्या नोटिसा
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विकासक, कंत्राटदार व अन्य प्रदूषण करण्यास जबाबदार असणाऱ्या व्यक्ती, संस्था, प्राधिकरणे यांना २२ लाखांपेक्षा अधिक रकमेच्या दंडाच्या नोटिसा बजावलेल्या आहेत.