नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रामध्ये सात वर्षांपूर्वी २८२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. नवीन १४३९ कॅमेरे बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून येणाºया सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. यामुळे शहरातील कॅमेऱ्यांची संख्या १७२१ होणार असून खाडीकिनाºयांसह सर्व चौकांवर लक्ष ठेवले जाणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. घातपाती कारवाईची भीती, चोरी, घरफोडी व इतर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण यामुळे सुरक्षेसाठी अत्याधुनिक उपकरणांचा वापर करणे आवश्यक आहे. शासनाच्या सूचना व नागरिकांसह पोलिसांच्या मागणीमुळे पालिकेने २०१२ मध्ये २८२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेºयांचे चित्रीकरण थेट पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षातून पाहता येते. यामुळे अनेक गुन्हेगारांना पकडणे शक्य झाले आहे. सानपाडामधील बँक आॅफ बडोदामधील भुयार खोदून टाकलेला दरोडा व इतर अनेक गुन्हे कॅमेºयांमुळे उघडकीस आले होते. यामुळे कॅमेºयांचे जाळे अधिक व्यापक करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून तब्बल १४३९ नवीन कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. ऐरोली-मुलुंड ब्रिज, ठाणे-दिघा रोड, शिळफाटा जंक्शन, वाशी टोलनाका, किल्ले गावठाण व बेलपाडा अशा सर्व प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे प्रस्तावित केले आहे. यामुळे शहरात येणाºया प्रत्येक वाहनाची माहिती सहजपणे उपलब्ध होणार आहे. याशिवाय सर्व चौकांमध्ये व रहदारी असलेल्या ठिकाणीही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. नवी मुंबईलाही दिवा ते दिवाळे दरम्यान विस्तीर्ण खाडीकिनारा लाभला आहे. या परिसरात घातपाती कारवाई होऊ नये, यासाठी कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.वाहतूक नियम तोडणाºयांवरही नियंत्रणच्महामार्गावर अतिवेगाने वाहने चालविणे, सिग्नल तोडणे व इतर नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात होत असते. वाहतुकीचे नियम तोडणाºयांवरही कॅमेºयाच्या माध्यमातून लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. यासाठी एकूण १५४ कोटी ३४ लाख रूपये खर्च होणार आहेत.च्२० जूनला होणाºया सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रस्ताव चर्चेसाठी येणार असून लोकप्रतिनिधी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर शहराच्या प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवणे पोलिसांनाही शक्य होणार आहे.कॅमेरे बसविण्याच्या प्रस्तावातील ठळक मुद्देच्महापालिकेच्या सर्व प्रवेशद्वारांवर हाय डेफिनेशन फिक्स व हायस्पीड कॅमेरे बसविण्यात येणारच्शहरात येणाºया वाहनांचे नंबर स्वयंचलितपणे वाचण्यासाठी ५४ एएनपीआर कॅमेरे बसविणेच्शहरातील २७ चौकांमध्ये प्रत्येक चार हाय डेफिनेशन कॅमेरे बसविणेच्रेल्वेस्टेशन, बसडेपो, मार्केट, मैदान, गार्डन व इतर वर्दळीच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात येणारच्पामबीच रोड, सायन-पनवेल महामार्ग, ठाणे-बेलापूर व मुख्य चौकांमध्ये एकूण ८० हायस्पीड कॅमेरे बसविण्यात येणारकॅमेºयाच्या प्रस्तावामधील सविस्तर माहितीच्महत्त्वाच्या ठिकाणी ९५४ हाय डेफिनेशन कॅमेरे बसविणेच्शहरात ३९६ पीटीझेड कॅमेरे बसविणेच्वाहनांची गती रोखण्यासाठी ८० स्पीडिंग कॅमेरेच्खाडीकिनाºयावर नऊ थर्मल कॅमेरेच्एकूण ४३ ठिकाणी पॅनिक अलार्म व कॉल बॉक्सची सुविधाच्शहरात १२६ ठिकाणी पब्लिक अनाउन्समेंट सुविधाच् डायनामिक मेसेजिंग साइनचा ५९ ठिकाणी वापरच् ३० दिवसांचा डेटा साठविण्याची सीसीटीमध्ये क्षमता