१४५ जोडपी विवाहबंधनात
By admin | Published: January 26, 2016 02:08 AM2016-01-26T02:08:31+5:302016-01-26T02:08:31+5:30
खारघरमध्ये सुरु झालेल्या ४९ व्या वार्षिक निरंकारी समागमाची सांगता सोमवारी झाली. यावेळी बाबा हरदेव सिंग यांच्या उपस्थितीत १४५ जोडप्यांचा सामुहिक विवाह
पनवेल : खारघरमध्ये सुरु झालेल्या ४९ व्या वार्षिक निरंकारी समागमाची सांगता सोमवारी झाली. यावेळी बाबा हरदेव सिंग यांच्या उपस्थितीत १४५ जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा पार पडला. समागमासाठी देशभरातून दोन लाखांहून जास्त भक्त खारघरमध्ये दाखल झाले होते.
समागमासाठी कॅनडाचे कौन्सिल आॅफ जनरल जॉर्डन रीव्ज हे उपस्थित होते. समागमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते पार पडले. प्रत्येक दिवशी बाबा हरदेव सिंग यांनी भक्तांना मार्गदर्शन केले. यावेळी निरंकारी प्रदर्शनी हे समागमाचे विशेष आकर्षण ठरले.
समागमाच्या शेवटच्या दिवशी बाबा हरदेव सिंग यांनी भक्तांना मार्गदर्शन करताना सांगितले की, संत महापुरुषांनी आपल्या उक्ती व कृतीद्वारे जी शिकवण दिली आहे, तिचे अंगीकरणाची प्रेरणा या समागमाद्वारे दिली जात असल्याचे सांगितले.
समागमासाठी यूके, यूएस, कॅनडा, आदी ठिकाणच्या ६२ डॉक्टरांनी टीम सेवेसाठी उपस्थित होती. सामुदायिक विवाह सोहळ्यात केरळ, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान आदी ठिकाणच्या १४५ जोडप्यांनी सहभाग नोंदविला. महाराष्ट्रातील ८३ वर व ७५ वधू या सोहळ्यात सहभागी झाले होते. यामध्ये उच्चशिक्षित वधुवरांचाही सहभाग होता. बाबांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडल्यामुळे धन्य झाल्याच्या प्रतिक्रिया यावेळी नवविवाहित जोडप्यांनी व्यक्त केली.