शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

महापेत एनटीटी डेटा ग्लोबलचे १४५६ कोटींचे डेटा सेंटर; १५,९४४ चौ. मी. क्षेत्रावर सहा इमारतींचे बांधकाम

By नारायण जाधव | Published: August 09, 2023 7:17 PM

शेकडोंना मिळणार रोजगार

नवी मुंबई : देशातील डेटा सेंटर आणि आयटी क्षेत्रात ७५ टक्के वाटा नवी मुंबईचा असेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच दिली होती. त्यादृष्टीने नवी मुंबईची वाटचाल सुरू असून शहरात एकामागून एक डेटा सेंटर येत आहेत. यानुसार एनटीटी डेटा ग्लाेबल सेंटर्स ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चरर्स कंपनीच्या महापे येथील डेटा सेंटरला पर्यावरण विभागासह राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकतीच परवानगी दिली आहे. महापे येथील या डेटा सेंटरमध्ये कंपनी १४५६ कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. नवी मुंबईत यापूर्वी मिलेनियम बिझनेस पार्कसह सिमेन्स, रिलायन्स, माईंडस्पेस, पटनी काॅम्प्युटरसह रिलायबल टेक पार्कने आयटी क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

असे असेल एनटीटीचे डेटा सेंटर१ - एनटीटी डेटा ग्लाेबल सेंटर्स ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चरर्स कंपनीच्या महापे येथील प्रस्तावित डेटा सेंटर भूखंड क्रमांक ई २३४ आणि ई २३८ असे दोन भूखंड मिळून १५,९४४ चौरस मीटर क्षेत्रावर दोन ब्लॉकमध्ये असणार आहे. यातील ब्लाॅक ए मध्ये तळ मजला अधिक सात माळ्यांची एक आणि तळ मजला अधिक चार माळ्यांच्या दोन इमारतींना तर ब्लॉक बी तळ मजला अधिक पाच माळ्यांची एक, तळ मजला अधिक चार माळ्यांची एक आणि तळ मजला अधिक एक माळा अशा तीन इमारतींना परवानगी दिली आहे. याठिकाणी येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी चारचाकी १७६ आणि १८ दुचाकींची सोय केली आहे.

२ - या डेटा सेंटरला ६० मेगावॅट वीज लागणार आहे. आणीबाणीप्रसंगी वीज खंडित होऊ नये यासाठी २५०० किलो वॅटचे ५१ डीजी सेट बसविण्यात येणार आहेत. याशिवाय येथे दररोज सुमारे १६ क्युबिक मीटर पाणी लागणार, त्याच्या निचऱ्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीस ११ क्युबिक मीटर क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र बांधण्यास सांगितले आहे. यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.

यापूर्वी परवानगी दिलेले डेटा सेंटर

यापूर्वी ग्रामरसी टेक पार्क प्रायव्हेट लिमिटेड कंपनीस १४९५ कोटी रुपये गुंतवून एमआयडीसीच्या ऐरोलीतील भूखंड क्रमांक ७ व ७ ए वर डेटा सेंटरला परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय गिगाप्लेक्स पार्कच्या विस्तारासही पर्यावरण विभागाने परवानगी दिली आहे. दिघा येथील या पार्कमध्ये ही कंपनी २४६८ कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे.टीटीसी औद्योगिक वसाहतीचे महत्त्व

नवी मुुंबईतील टीटीसी औद्योगिक वसाहतीत मुबलक पाणी, रस्ते, रेल्वेचे जाळे आहे. मुंबई, ठाणे, पनवेल-उरण आणि कल्याण-डोंबिवली महानगरांना लागूनच ही वसाहत आहे. जेएनपीटी बंदरासह नियोजित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून जवळच आहे. मुंबई-पुणे या दोन शहरांना जोडणारा शीव-पनवेल महामार्ग येथूनच जातो.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई