15566 कोटी खर्च; 2500 मृत्यू; तरी...; मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत राज ठाकरेंचा संताप

By वैभव गायकर | Published: August 16, 2023 03:43 PM2023-08-16T15:43:55+5:302023-08-16T15:46:29+5:30

भाषणाची सुरुवात करतानाच ठाकरे यांनी मी भाषण करायला आलो नाही मी तुम्हाला झेंडा दाखवायला आलो असल्याचे सांगत.मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत मोठ्या आंदोलनाचा ईशारा दिला.

15 thousand 566 crore expenditure; 2500 deaths; Still the road is incomplete; Raj Thackeray's anger regarding the remoteness of the Mumbai-Goa highway | 15566 कोटी खर्च; 2500 मृत्यू; तरी...; मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत राज ठाकरेंचा संताप

15566 कोटी खर्च; 2500 मृत्यू; तरी...; मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत राज ठाकरेंचा संताप

googlenewsNext

पनवेल : 2007 साली सुरु झालेला मुंबई गोवा महामार्गाच्या कामावर आजपर्यंत 15 हजार 566 कोटी रुपये खर्च झाले आहेत.विशेष म्हणजे रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आजपर्यंत 2500 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.मात्र तरी देखील या रस्त्याचे काम अर्धवटच असुन जनतेने निवडणूक दिलेले लोकप्रतिनिधी करतात तरी काय ? असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी दि.16 रोजी पनवेल येथे मनसेच्या निर्धार मेळाव्यात उपस्थित केला.

      भाषणाची सुरुवात करतानाच ठाकरे यांनी मी भाषण करायला आलो नाही मी तुम्हाला झेंडा दाखवायला आलो असल्याचे सांगत.मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत मोठ्या आंदोलनाचा ईशारा दिला.चांद्रयान चंद्रावर जाऊन उपयोग काय ?तिथे जाऊन खड्डेच बघायचे होते तर ते चंद्रयान महाराष्ट्रात सोडायचं होत महाराष्ट्रातही खड्डे दिसले असल्याची टीका  राज ठाकरे यांनी केली.2007 सालापासून कॉग्रेस नंतर कोणाकोणाचे सरकार आले मात्र या खड्ड्यातून जात असताना तेच तेच लोकप्रतिनिधी का निवडता ? खोटे आश्वासन दिलेल्या नेत्यांवर विश्वास का ठेवता ? अमित ठाकरे एका मार्गावरून जात असताना टोल नाका मनसैनिकांनी फोडला तर भाजपने टीका केली की ; रस्ते बांधायला शिका आणि उभारायला शिका मग भाजपने दुसऱ्यांचे आमदार न फोडता स्वतःचा पक्ष बांधायला शिका अशी खोचक टीका यावेळी भाजपवर ठाकरे यांनी केली.2024 पर्यंत हा मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होईल असे मुख्यमंत्री सांगतात .मग आत्ताचे काय ? माणसे मेली त्याचे काय ? गणेशोत्सवात जाताना पुन्हा याच दुरावस्था झालेल्या मार्गातून कोंकणवासी जातील का ? अशी टीका ठाकरेंनी सरकारवर केली.रस्ते व्यवस्थित केले तर पैसे खायला कसा मिळणार ? तो सहा महिन्यात खराब व्हायला पाहिजे.तेव्हाच टेंडर,टक्केवारी कंत्राट मिळेल हा धंदा सुरूच असून हे कुठेतरी थांबायला हवे.मुंबई गोवा महामार्गाबाबत गडकरींना विचारला तर ते सांगतात कंत्राटदार पळून गेला.लवकरात लवकर मुंबई गोवा मागमार्गाचे काम पूर्ण झाले पाहिजे.

       कोंकणातील जमिनी कोणाच्या घश्यात जात आहेत.नाणार गेल्यावर बारसू कसे काय आले ? कोंकणवासियींना थोड्याशा पैशासाठी आपल्या जमिनी विकु नयेत असेही अवाहन यावेळी कोंकणवासीयांनाकेले .

पनवेल ते सावंत वाडी पर्यंत रस्त्यावर उतरावे लागेल 
मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या रस्त्याबाबत मनसैनिकानं पनवेल ते सावंतवाडी पर्यंत रस्त्यावर उतरावे लागेल.आपल्याला लोकांना त्रास न देता आंदोलन करायचे आहे.हे आंदोलन सरकारच्या सदैव्य लक्षात राहणारे असावे असा ईशारा देत.मुंबई गोवा महामार्गाच्या आंदोलनाबाबत मनसैनिकांनी तयार राहण्याचा सल्ला यावेळी पनवेल येथील निर्धार मेळाव्यात दिला.
 

Web Title: 15 thousand 566 crore expenditure; 2500 deaths; Still the road is incomplete; Raj Thackeray's anger regarding the remoteness of the Mumbai-Goa highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.