ठाणे जिल्हा कॅरम स्पर्धेत १५० स्पर्धकांचा सहभाग

By नारायण जाधव | Published: January 30, 2024 12:52 PM2024-01-30T12:52:49+5:302024-01-30T12:53:18+5:30

महिला एकेरीत समृद्धी घाडीगावकर तर पुरुष एकेरीत झईद अहमद फारूकी अंसारी विजयी

150 contestants participated in Thane district carrom competition | ठाणे जिल्हा कॅरम स्पर्धेत १५० स्पर्धकांचा सहभाग

ठाणे जिल्हा कॅरम स्पर्धेत १५० स्पर्धकांचा सहभाग

नवी मुंबई : ठाणे जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशन यांनी ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशनच्या संकुलनात दिनांक २७ व २८ जानेवारी २०२४ मध्ये कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेमध्ये संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील विविध स्तरातील स्पर्धकांनी भाग घेऊन आपले कौशल्य प्रदर्शित केले.
 
ठाणे जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत संपूर्ण ठाणे जिल्ह्यामधून महिला एकेरी व पुरुष एकेरी एकुण १५० स्पर्धकांनी भाग घेऊन ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडली सर्व विजेते, उपविजेते, उपांत्यफेरी विजेते यांना रोख रक्कम प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले तसेच महिला एकेरी गट विजेती समृद्धी घाडीगावकर,मधुरा महेश देवले उपविजेती,चैताली अनंत सुवारे उप-उपविजेती तसेच पुरुष एकेरी गट विजेता झईद अहमद फारूकी अंसारी, उपविजेता मोहम्मद ओवेस अंसारी, १ ला उपविजेता दत्ता महादेव कदम, यांना चषक व पदके देऊन गौरवण्यात आले.

प्रमुख पंच रमेश चव्हाण यांच्या देखरेखी खालील सदर सामने पार पडले. मान्यवर उपस्थिती ठाणे जिल्हा कॅरम संघटनेचे सचिव श्जितेंद्र दळवी , उपाध्यक्ष  वीणा चव्हाण तसेच ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव हेमंत अनार्थे, सह खजिनदार अनंता कामथ, समिति सदस्य मोहन सोमवंशी, समिति सदस्य संतोष राणे व क्रीडा समन्वय श्राजीव साटम.

स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे आहे

महिला एकेरी
विजेती समृद्धी घाडीगावकर विरुद्ध उप विजेती मधुरा महेश देवले
१८-१३ , २१-०७
१ ली उप विजेती चैताली अनंत सुवारे विरुद्ध २ री उप विजेती स्पृहा सागर लिंगायत
२५-०१, १२-१८, २५-०१
पुरुष एकेरी
विजेता झईद  अहमद फारूकी अंसारी विरुद्ध उपविजेता मोहम्मद ओवेस अंसारी
१६-१७,२५-०७,२५-१५
१ ला उपविजेता दत्ता महादेव कदम विरुद्ध असिफ खान
१३-१७,२१-१८,२५-१२

Web Title: 150 contestants participated in Thane district carrom competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे