नवी मुंबई : सिडकोच्या १४८३८ घरांसाठी तब्बल दीड लाख अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज भरण्यासाठी रविवार दुपारपर्यंतची वेळ आहे, त्यामुळे शेवटच्या टप्प्यात यात आणखी वाढ होण्याची शक्यता सिडकोच्या संबंधित विभागाने व्यक्त केली आहे.आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्पउत्पन्न गटासाठी सिडकोने १४८३८ घरांचा मेगागृहप्रकल्प जाहीर केला आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तर स्वातंत्र्यदिनापासून आॅनलाइन अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. १६ सप्टेंबर दुपारपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. विशेष म्हणजे, या योजनेच्या संकेतस्थळाला श्निवारपर्यंत दोन लाख ८० हजार नागरिकांनी भेट दिली आहे, तर जवळपास दोन लाख ग्राहकांनी अर्ज भरले आहेत. त्यापैकी एक लाख ४१ हजार ग्राहकांनी पैसे भरून अर्जाची प्रक्रिया पूर्ण केली आहे.विशेष म्हणजे, शुक्रवारी प्राप्त अर्जांची संख्या एक लाख ६० हजार ग्राहकांनी अर्ज दाखल केले होते. शनिवारच्या दिवसांत त्यात ४० हजार अर्जांची वाढ झाली आहे. तर शनिवारी दिवसभरात जवळपास २० हजार अर्जदारांनी आॅनलाइन शुल्क अदा केले आहे. अर्ज आणि पैसे भरण्यासाठी उद्या दुपारपर्यंतची वेळ आहे, त्यामुळे शेवटच्या टप्प्यात यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सिडकोच्या १४८३४ घरांसाठी दीड लाख अर्ज दाखल; आज शेवटचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 4:20 AM