एपीएमसीमधून १५०० किलो प्लॅस्टिक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:28 AM2019-01-28T00:28:53+5:302019-01-28T00:29:20+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ व एपीएमसी प्रशासनाने प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांविरोधात मोहीम राबविली.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ व एपीएमसी प्रशासनाने प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांविरोधात मोहीम राबविली. दोन दिवसांमध्ये १५०० किलो प्लॅस्टिक जप्त केले असून, ३५ हजार रुपये दंड वसूल केला आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने यापूर्वी धाडी टाकून प्लॅस्टिकचा मोठा साठा जप्त केला आहे. महानगरपालिकेनेही यापूर्वी अनेक वेळा धाडी टाकून प्लॅस्टिकची विक्री करणाºयांवर कारवाई केली आहे. यानंतर दोन दिवस बाजार समिती व एमपीसीबीच्या अधिकाºयांनी मसाला मार्केटमध्ये संयुक्त मोहीम राबविली. पहिल्या दिवशी २०० किलो व दुसºया दिवशी तब्बल १३०० किलोचा साठा हस्तगत केला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी केतन पाटील, इंद्रजीत देशमुख, बाजार समितीचे किरण घोलप, सी. टी. पवार, आर. आर. गुरव यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला होता. एमपीसीबीच्या पथकाने मार्केटमध्ये जनजागृती केली. माल पाठविणाºयांनाही प्लॅस्टिकचा वापर करू नये, असे आवाहन केले.
व्यापाºयाने दिली चिल्लर
प्लॅस्टिक सापडलेल्या व्यापाºयांकडून प्रत्येकी ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. रॉयल मसाला व ड्रायफ्रुट कंपनीच्या दुकानदाराने ५ हजार रुपयांची चिल्लर दंड स्वरूपात दिली. यामुळे कारवाई करणाºया पथकाला चिल्लर मोजण्यास खूप वेळ गेला. कारवाई करणाºयांना मकरंद अनासपुरे यांची भूमिका असलेल्या गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा चित्रपटाची आठवण झाली.