प्रवेशाकरिता १६७३ अर्ज

By admin | Published: February 21, 2017 06:25 AM2017-02-21T06:25:38+5:302017-02-21T06:25:38+5:30

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत दुर्बल व वंचित घटकातील बालकांस

1673 applications for admission | प्रवेशाकरिता १६७३ अर्ज

प्रवेशाकरिता १६७३ अर्ज

Next

नवी मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत दुर्बल व वंचित घटकातील बालकांस आरक्षित २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचा मंगळवारी २१ फेब्रुवारी रोजी शेवटचा दिवस आहे. या प्रक्रियेंतर्गत शालेय प्रवेशाकरिता ठाणे जिल्ह्यातून ४७६६ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले असून, यामध्ये २२७६ असे सर्वाधिक अर्ज नवी मुंबई परिसरातील असल्याची माहिती शिक्षणाधिकारी संदीप सांगवे यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यापैकी ६०३ अर्ज नाकारण्यात आले असून, १६७३ अर्ज स्वीकारण्यात आले आहेत.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील १०७ शाळांचा यामध्ये समावेश असून पहिलीकरिता २३७५ जागा तर पूर्वप्राथमिक विभागातील प्रथम प्रवेशाकरिता १३९२ जागा शिल्लक आहेत. यंदा प्रवेशाकरिता अंतराची मर्यादा नसल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. पाल्याच्या प्रवेशाकरिता १ लाख रुपये इतकी आर्थिक उत्पन्न मर्यादा आहे. या प्रवेश प्रक्रियेंतर्गत शिक्षण विभागाच्या वतीने चार दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेबाबत जानेवारी महिन्यात शाळांकरिता विशेष कार्यशाळा राबविण्यात आल्या होत्या. यावेळी मागील वर्षाच्या आॅफलाइन परिपत्रकांची माहिती शाळांकडून मागविण्यात आल्या होत्या. या कार्यशाळेत आॅनलाइन प्रक्रियेबाबत समस्यांचे निराकरण करण्यात आाले. पालकांना अर्ज भरताना काही अडचणी येऊ नयेत याकरिता १२ विशेष मदत केंद्रे स्थापन करण्यात येऊन त्याठिकाणी पालकांना अर्ज भरण्यासाठी नेमलेल्या मदत केंद्र अधिकाऱ्यांमार्फत सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून देण्यात आली होती तसेच संपर्कासाठी मदत केंद्र अधिकाऱ्यांचे संपर्कध्वनी व ई-मेल आयडी उपलब्ध करून देण्यात आले होते. अर्ज स्वीकृत झालेल्या पालकांना त्यांच्या विभागातील प्रवेशासाठी पात्र झालेली शाळा त्यांनी अर्जात भरलेल्या मोबाइल क्र मांकावर शासनामार्फत आॅनलाइन कळविली जाणार असून १ ते ९ मार्च या कालावधीत पालकांनी त्या शाळेत मूळ कागदपत्रांसह जाऊन आपला प्रवेश निश्चित करून घ्यावयाचा आहे. या प्रक्रि येअंतर्गत ज्या शाळेत प्रवेश निश्चित झालेला आहे त्या शाळेत प्रवेश न घेतल्यास त्या मुलाला त्या वर्षातील पुढील प्रवेश फेऱ्यांच्या लॉटऱ्यांमध्ये सहभागी करून घेतले जाणार नाही याची नोंद घ्यावयाची आहे. (प्रतिनिधी)

एखाद्या शाळेत प्रवेश घेण्याच्या विहित मुदतीनंतर शाळांनी आपल्याकडील रिक्त पदांची माहिती तपासून उर्वरित रिक्त जागा आॅनलाइन दर्शवावयाच्या आहेत. याकरिता सरळ डाटा प्रणालीचा वापर केला जाणार आहे. त्यानंतर रिक्त जागांकरिता आॅनलाइन पध्दतीनेच दुसरी लॉटरी काढण्यात येणार आहे. ही प्रवेश प्रक्रि या अशा प्रकारच्या पाच टप्प्यात होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी संगवे यांनी दिली.

Web Title: 1673 applications for admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.