अग्निशमनमधील १९ कर्मचाऱ्यांना पदोन्नती; प्रलंबित प्रश्न सुटल्याने आनंदाचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 06:40 AM2018-09-07T06:40:14+5:302018-09-07T06:40:22+5:30
अग्निशमन विभाग सक्षम करण्यासाठी महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी पावले उचलली आहेत. अतिकालिक भत्त्यामध्ये तीन पट वाढ केली आहे.
नवी मुंबई : अग्निशमन विभाग सक्षम करण्यासाठी महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी पावले उचलली आहेत. अतिकालिक भत्त्यामध्ये तीन पट वाढ केली आहे. २६० अधिकारी व कर्मचाºयांची भरती सुरू केली असून १९ अधिकारी व कर्मचाºयांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रलंबित तीन प्रश्न सुटल्यामुळे अग्निशमन जवानांनी आनंद व्यक्त केला आहे.
अग्निशमन दलात अनेक वर्षे कार्यरत असणाºया अनुभवी अधिकारी, कर्मचारीवृंदाला त्यांच्या श्रेणी व अनुभवानुसार पदोन्नती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अग्निशमन केंद्र अधिकारी, अग्निशमन प्रणेता व चालक यंत्रचालक (ड्रायव्हर आॅपरेटर) या संवर्गात १९ जणांना पदोन्नतीचा लाभ देण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त (शहर) यांच्या अध्यक्षतेखालील पदोन्नती समितीने संपूर्ण छाननी करून पदोन्नती सूचित केली असून या अनुषंगाने सध्या सहा. केंद्र अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या जगदीश तुकाराम पाटील यांना अग्निशमन केंद्र अधिकारी संवर्गात पदोन्नती देण्यात आलेली आहे. अग्निशामक पदावर सद्यस्थितीत कार्यरत पदाजी निरगुडे, विनोद देठे, रमेश कोकाटे, नितीन कांबळे, किशोर कोंडाळकर, पांडुरंग हंबरे, कैलास वाघचौरे, दशरथ कांबळे, सुधाकर पाटील, अजय पांचाळ, संतोष कोळी, चंद्रकांत घाडगे, शैलेश जगताप, किरण आतकरी, नवनाथ गरु ड या १५ कर्मचाºयांना अग्निशमन प्रणेता संवर्गात पदोन्नती देण्यात आलेली आहे. रमेश जाधव, दत्ता पाटोळे, रामेश्वर पवार यांना वाहनचालक (अग्निशमन) पदावर सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना चालक यंत्रचालक ड्रायव्हर आॅपरेटर या संवर्गात पदोन्नती देण्यात आलेली आहे. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचे महानगरपालिका अधिकारी, कर्मचारीवृंदाच्या सेवाविषयक बाबींकडेही बारीक लक्ष असून या पदोन्नतीमुळे मनोबल वाढेल, अशी प्रतिक्रिया अग्निशमन कर्मचाºयांनी व्यक्त केली आहे.