सिडकोची कर्मचाऱ्यांना १९ हजारांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 03:16 AM2019-02-20T03:16:33+5:302019-02-20T03:17:48+5:30
सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन
नवी मुंबई : राज्यातील सर्वात श्रीमंत महामंडळ म्हणून सिडकोची ओळख आहे. या महामंडळाच्या स्थापनेला येत्या १७ मार्च रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे या वर्षी कर्मचाºयांना बर्थडे गिफ्ट म्हणून प्रत्येकी १९ हजार रुपये मिळणार आहेत. सिडकोच्या संचालक मंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
नवी मुंबई शहराची निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारने सिडको महामंडळाची स्थापना केली. शहरनिर्मितीचे शिवधनुष्य उत्तमरीत्या पेलणाºया सिडकोने आपल्या आस्थापनेवरील कर्मचाºयांचे हित जपण्यात कधीच आखडता हात घेतला नाही. त्यानुसार प्रत्येक वर्धापन दिनाला कर्मचाºयांना गॅदरिंग फंड म्हणून ठरावीक रक्कम दिली जाते. गेल्या वर्षी प्रत्येकी १७ हजार रुपये देण्यात आले होते. यावर्षी १९ हजार रुपये देण्याचा निर्णय झाला आहे. ही रक्कम किसान विकास पत्राच्या स्वरूपात कर्मचाºयांना दिली जाणार आहे. सिडकोत सध्या अधिकारी आणि कर्मचाºयांची संख्या दोन हजारांच्या घरात आहे. या सर्वांना समान स्तरावर प्रत्येकी १९ हजार रुपयांची वर्धापनदिनाची भेट दिली जाणार आहे.