कोपरखैरणेत इमारतीची गॅलरी कोसळल्याने २० कुटुंबाना हलविले
By नारायण जाधव | Published: August 4, 2024 12:05 AM2024-08-04T00:05:10+5:302024-08-04T00:05:20+5:30
अण्णासाहेब पाटील समाज मंदिर, कोपरखैरणे येथे स्थलांतरित करण्यात आलेले आहे.
नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कोपरखैरणे विभागातील सेक्टर १२, बोनकोडे गाव येथे स्वागत बारच्या समोर असलेल्या गोपालसिंग या चार मजली इमारतीच्या एका फ्लॅटची गॅलरी कोसळल्याने व इमारतीची स्थिती धोकादायक असल्याने तेथील रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इमारतीच्या 20 सदनिकांमधील कुटुंबांनाआयुक्त यांचे निर्देशानुसार परिमंडळ २ चे उपायुक्त डाॅ. कैलास गायकवाड आणि कोपरखैरणे विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनिल काठोळे यांच्यामार्फत अण्णासाहेब पाटील समाज मंदिर, कोपरखैरणे येथे स्थलांतरित करण्यात आलेले आहे.
इमारतीतून ७२ रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आलेले असून त्यांच्या तात्पुरत्या निवासासह त्यांना जेवण व मूलभूत सुविधा महानगरपालिकेच्या वतीने पुरविण्यात येत आहेत. त्यावरील नियंत्रणासाठी कोपरखैरणे विभाग कार्यालयामार्फत नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.