केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या ४० टक्के शुल्क वाढीमुळे जेएनपीए बंदरात २०० कंटेनर होल्डवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 06:16 PM2023-08-21T18:16:36+5:302023-08-21T18:16:53+5:30

४००० टन कांदा सडण्याच्या तयारीत : सुमारे २० कोटींचे आर्थिक नुकसान : व्यापारी, शेतकरी, निर्यातदार चिंतेत

200 containers held at JNPA port due to central government's 40 percent duty hike on onion exports | केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या ४० टक्के शुल्क वाढीमुळे जेएनपीए बंदरात २०० कंटेनर होल्डवर

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या ४० टक्के शुल्क वाढीमुळे जेएनपीए बंदरात २०० कंटेनर होल्डवर

googlenewsNext

मधुकर ठाकूर

उरण : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याचा शनिवारी (१९)  अचानक निर्णय घेतल्याने जेएनपीए बंदरात आणि बंदरा बाहेरील विविध कंटेनर यार्ड मध्ये सुमारे २०० कंटेनर कस्टम विभागाने होल्ड केले आहेत.कांदा नाशिवंत माल असल्याने मलेशिया, श्रीलंका, दुबई आदी देशात पाठविण्यात येणारा सुमारे चार हजार टन कांदा सडण्याच्या तयारीत आहे.

यामुळे व्यापारी, शेतकरी, निर्यातदार कंपन्यांचे सुमारे २० कोटींचे आर्थिक नुकसान होणार असल्याची माहिती स्वान ओव्हरहेड या निर्यात कंपनीचे मालक राहुल पवार यांनी दिली. केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात शुल्क शुन्यावरुन थेट ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र केंद्र सरकारने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे व्यापारी, शेतकरी, निर्यातदार आदी सर्वजण हवालदिल झाले आहेत.शनिवारी केंद्र सरकारच्या निर्णयाआधीच जेएनपीए बंदरातच सुमारे कांद्याचे ६०- ७० कंटेनर निर्यातीसाठी तयार होते.

मात्र कस्टम विभागाने कांद्याचे कंटेनर होल्डवर ठेवले आहेत.तर शेकडो कांद्याचे शेकडो कंटेनर बंदराबाहेर  निर्यातीच्या प्रतिक्षेत उभे आहेत.
तर जेएनपीए अंतर्गत असलेल्या विविध बंदरात आणि विविध कंटेनर यार्डमध्ये महाराष्ट्रातुन विविध ठिकाणांहून आलेले सुमारे निर्यातीसाठी आलेले सुमारे २०० कंटेनर होल्डवर ठेवण्यात आले आहेत.या कंटेनर कार्गोमध्ये निर्यातीसाठी पाठविण्यात आलेला सुमारे ४००० टन कांदा सडण्याच्या तयारीत आहे.
यामुळे व्यापारी, शेतकरी,निर्यातदार कंपन्यांचे सुमारे २० कोटींचे आर्थिक नुकसान होणार असल्याची माहिती निर्यातदार आणि बच्चूभाई ॲण्ड कंपनीचे मालक इरफान मेनन यांनी दिली.केंद्र सरकारने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे मात्र शेकडो निर्यातदार आर्थिक संकटात सापडले असल्याचेही इरफान मेनन यांनी सांगितले.

Web Title: 200 containers held at JNPA port due to central government's 40 percent duty hike on onion exports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.