शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

प्रकल्पग्रस्तांचा २०३८ एकर जमिनीसाठी लढा सुरू

By admin | Published: May 07, 2017 6:30 AM

शासनाने संपादित केलेल्या जमिनीमधील साडेबारा टक्के भूखंड प्रकल्पग्रस्तांना परत देण्याचा निर्णय घेतला; परंतु प्रत्यक्षात

नामदेव मोरे / लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शासनाने संपादित केलेल्या जमिनीमधील साडेबारा टक्के भूखंड प्रकल्पग्रस्तांना परत देण्याचा निर्णय घेतला; परंतु प्रत्यक्षात ८.७५ टक्के जमीन परत दिली व ३.७५ टक्के जमीन सामाजिक सुविधेसाठी राखून ठेवली. आतापर्यंत तब्बल २०३८ एकर जमीन सिडकोने त्यांच्याकडे राखून ठेवली असून त्यामधील फक्त ३७ एकर प्रकल्पग्रस्तांच्या संस्थांना दिली आहे. उर्वरित जमिनीचा वापर आमच्यासाठी केला नसेल तर ती परत मिळविण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी केला असून आगरी कोळी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्तांनी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली जानेवारी १९८४मध्ये जासईमध्ये केलेल्या तीव्र आंदोलनामध्ये पाच शेतकरी हुतात्मा झाले व ३८ जण गंभीर जखमी झाले. या आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासनाने संपादित केलेल्या जमिनीपैकी १२.५ टक्के जमीन परत देण्याचा निर्णय घेतला. देशामध्ये संपादित केलेल्या जमिनीपैकी काही भाग परत देण्याचा निर्णय पहिल्यांदा झाला. ७ मार्च १९९० मध्ये शासनाने हा निर्णय घेतला. सिडकोला २७ वर्षांमध्ये अद्याप सर्व भूखंडाचे वाटप होऊ शकले नाही. भूखंड वितरीत करताना पूर्ण साडेबारा टक्के जमीन दिली नाही. शेतकऱ्यांना ८.७५ टक्के जमीन परत दिली व उरलेली ३.७५ टक्के जमीन सामाजिक सुविधेसाठी राखून ठेवली. प्रकल्पग्रस्तांची ५४ हजार ३१३ एकर जमीन संपादित केली आहे. साडेबारा टक्के योजनेअंतर्गत जवळपास ६७९३ एकर जमीन परत देणे आवश्यक आहे. यापैकी पावणेचार टक्केप्रमाणे २०३८ एकर जमीन सामाजिक सुविधेसाठी राखून ठेवली आहे. प्रत्यक्षात गावांमध्ये सामाजिक सुविधा देण्यात आलेल्या दिसत नाहीत. प्रकल्पग्रस्तांच्या संस्थांना फक्त ३७ एकर जमीन वितरीत केली आहे. उर्वरित २००१ एकर जमिनीचे काय झाले याविषयी आगरी कोळी युथ फाउंडेशनने अनेक महिन्यांपासून अभ्यास सुरू केला होता. आगरी कोळी युथ फाउंडेशनने अ‍ॅड. राहुल ठाकूर यांच्या वतीने ४ मे रोजी जनहित याचिका दाखल केली आहे. यामध्ये प्रत्यक्षात २८ याचिकाकर्ते आहेत. सामाजिक सुविधेसाठी कपात करून घेतलेले भूखंड मूळ मालकांना परत देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. न्यायालयात लढा देण्यासाठी गावनिहाय वितरीत केलेल्या जमिनीचा व मिळालेल्या मोबदल्यासह इतर सर्व माहिती संकलित केली असून, ते म्हणने न्यायालयात सादर केले जाणार आहे. प्रकल्पग्रस्तांसाठीच्या याचिकाकर्त्यांची यादी मनोज जगन्नाथ म्हात्रे (जुहूगाव), मिलिंद अविनाश पाटील (घणसोली), अ‍ॅड. सुनील महादेव पाटील (कुकशेत), संदीप जनार्दन पाटील (कोपरखैरणे), जयश्री अरविंद पाटील (जुहूगाव), अजय पंडित मुंडे (घणसोली), महेश प्रल्हाद पाटील (शिरवणे), कोमल कैलास पाटील (रबाळे), संदेश विठ्ठल ठाकूर (उरण), प्रमोद रामनाथ ठाकूर (उरण), हर्षद ठाकूर (उरण), सुशांत श्रीकांत पाटील (वसई), डॉ. सुरेंद्र हरिश्चंद्र पाटील (शिरवणे), डॉ. रवींद्र द्वारकानाथ म्हात्रे (घणसोली), डॉ. अमोल म्हात्रे (तुर्भे), डॉ. वेदांगिनी किशोर नाईक (बोनकोडे), डॉ. निवेदिता दीपक पाटील (करावे), आगरी समाज सेवा संस्था (महाराष्ट्र प्रदेश), आगरी विकास सामाजिक संस्था (वाघबीळ, ठाणे), आगरी एकता विकास सामाजिक संस्था (कळवा, ठाणे), जाणता राजा सामाजिक विकास मंडळ (बामन डोंगरी, पनवेल), सन्नी वासुदेव चौधरी (ठाणे), प्रीतेश छगन पाटील (ठाणे), प्रकाश पद्माकर पाटील (ठाणे), स्वप्निल किशोर वाफेकर (ठाणे), महेंद्र पंजानंद पाटील (ठाणे), मयूर कोटकर (ठाणे).तालुकानिहाय जमिनीचा तपशील (एकर)तालुकासंपादित जमीन३.७५ टक्केठाणे११५९१४३४.६८उरण१९८८५७४५पनवेल२२८७५७५७एकूण५४३५१२०३८