शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

२१ शहरांमध्ये पाण्याचा प्रचंड खळखळाट अन् साफसफाईही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 7:44 AM

१५ व्या वित्त आयोगाचे मुंबईला ३३४ तर नवी मुंबईला ३३.३४ कोटींचे बळ

नारायण जाधव    लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : राज्यातील मिलेनियम प्लस २१ शहरांना १५व्या वित्त आयोगांतर्गत पाणीपुरवठा व घनकचरा व्यवस्थापनासाठी २०२२-२३ या वर्षासाठी ८१९ काेटी ३० लाखांचे भरीव अनुदान नगरविकास विभागाने २४ मे २०२३ रोजी वितरित केले. मात्र, यात उरण व पनवेलसह कर्जत, खोपोली, पेण, अलिबाग यांना मात्र ठेंगा आहे. 

 मुंबई पालिका ३३४ कोटी तीन लाख ४३ हजार २६४, नवी मुंबई  ३३ कोटी ३४ लाख ४९ हजार ४०७, ठाणे ५१ कोटी ७४ लाख १४ हजार ७४४, केडीएमसी ३६ कोटी ९१ लाख ४६ हजार ७४८,  मीरा-भाईंदर २४ कोटी २७ लाख ४० हजार ३१०, उल्हासनगर १३ कोटी २७ लाख तीन हजार ३१३, अंबरनाथ ८ कोटी २४ लाख ६७ हजार ६०० व बदलापूर सहा कोटी १६ लाख ३२ हजार ६१४  तर वसई-विरारला ३० कोटी ६० लाखांचे बळ दिले आहे.

रायगडमध्ये संताप  १५व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून एमएमआरडीए क्षेत्रातील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, सी लिंक, जेएनपीएसारखे मोठे बंदर आणि तळोजा, रसायनीसारख्या औद्योगिक वसाहतींचे शहर असलेल्या पनवेल महापालिका आणि उरण नगरपालिकेसह कर्जत, खोपोली, पेण, अलिबाग वगळल्याने संताप व्यक्त होत आहे. कारण याच भागात आता तिसरी मुंबई विकसित होत आहे. विरार-अलिबाग कॉरिडोर, एक्सप्रेस वे परिसरातील ग्रोथ सेंटर, खासगी विकासकांच्या टाऊनशिप आकार  घेत आहेत. याच भागात  पाणीटंचाईच्या झळा तीव्र आहेत.    

स्वच्छ भारत अभियानास बळघनकचरा व्यवस्थापनासाठी अनुदान दिल्याने स्वच्छ भारत अभियानात महत्त्वाचा घटक असलेल्या घनकचरा व्यवस्थापनातील त्रुटी दूर करून क्षेपणभूमी, कचऱ्यापासून खतनिर्मिती, वीजनिर्मिती, घनकचऱ्यापासून विटा बनविणे यांसारखे प्रकल्प राबविता येणार आहेत. यातून या शहरांतील रस्तोरस्ती दिसणारे कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी दूर होऊन देशातील स्वच्छ भारत अभियानातील त्यांची रँकिंग वाढण्यासही मदत होणार आहे.   

या शहरांनाही मिळाले अनुदानपुणे नागरी समूहातील पाच शहरांना १४० कोटी, नाशिक नागरी समूहातील तीन शहरांना ३८ कोटी ७० लाख, छत्रपती संभाजीनगर विभागातील शहरे ३३ कोटी आणि नागपूर नागरी समूहातील महानगरांना ६९ कोटींचे अनुदान वितरित केले आहे.