नवी मुंबई : मालमत्ता कर थकविणाऱ्या विरोधात महापालिकेने कंबर कसली आहे. तब्बल १७१७ बड्या थकबाकीदारांना ४८ तासांच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यातील २१ जणांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्यांनी तब्बल २२ कोटी १६ लाखांचा कर थकविला आहे.महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार एक लाखांपर्यंतचा कर थकविणाऱ्या १000६ जणांची यादी तयार करण्यात आली आहे. तर त्यापेक्षा अधिक रकमेची थकबाकी असणाऱ्यांना निर्वाणीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. गुरुवारपासून करवसुली करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. महापालिकेच्या या कारवाईमुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)
२१ थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त
By admin | Published: February 11, 2017 4:32 AM